‘माघ कृष्ण द्वादशी (२५.२.२०२५) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. ओंकार राजेंद्र कानडे आणि चि.सौ.कां. मृण्मयी संतोष गांधी यांचा शुभविवाह मिरज येथे आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. ओंकार कानडे आणि चि.सौ.कां. मृण्मयी गांधी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
चि. ओंकार कानडे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. नीटनेटकेपणा
‘ओंकारदादामध्ये नीटनीटकेपणा आहे. त्याचे पटल आणि खण यांतील सर्व साहित्य नीट लावलेले असते. त्याचे रहाणीमान नीटनेटके आहे.
२. व्यवस्थितपणा
दादाची लिखाण करण्याची पद्धत, तो सिद्ध करत असलेल्या धारिका, त्याने शिबिरात विषय मांडण्यासाठी केलेली ‘पीपीटी’ (Power Point Presentaion) (टीप) आदी सर्व व्यवस्थित आणि नेमकेपणाने केलेले असते. तो संस्थेच्या वतीने राबवण्यात येणार्या मोहिमांच्या संदर्भातील सेवा कुशलतेने करतो.
(टीप : ही एक संगणकीय प्रणाली असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.)
३. इतरांना साहाय्य करणे
तो साधकांना त्यांच्या अडचणीत तत्परतेने साहाय्य करतो. दादाला आधुनिक तंत्रज्ञानाविषयी चांगली माहिती आहे. साधकांना नवीन भ्रमणभाष, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आदी खरेदी करायचे असल्यास ते ओंकारदादाला विचारतात. दादाही त्याच्या व्यस्ततेतून वेळ काढून इतरांना प्रेमाने साहाय्य करतो.
४. प्रेमळ
तो मितभाषी असला, तरी त्याचे साधकांशी आपुलकीचे संबंध आहेत. एखाद्या साधकाचा वाढदिवस असल्यास त्याच्यासाठी कविता करणे, त्याच्यासाठी खाऊ आणणे, असे तो उत्साहाने करतो.
५. सेवेची तळमळ
दादा क्लिष्ट आणि बौद्धिक सेवा चिकाटीने पूर्ण करतो. तो सेवा अचूक करण्याचा प्रयत्न करतो. तो आश्रम स्तरावरील सेवा करण्याचे दायित्वही घेतो. तो उत्साहाने सेवा करतो.
६. संतांप्रती भाव
दादाचा सेवेनिमित्त अनेक संतांशी संपर्क येतो. त्याच्यामध्ये सर्व संतांप्रती भाव आहे.’
– सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२५)
गुरुमाऊली, करून घ्या जलद आध्यात्मिक प्रगती ओंकारची ।
आश्रमातीलच नाही, तर प्रसारातील साधकांचाही आहेस आधार तू ।
साधना असो कि सेवा, प्रत्येकास साहाय्य करण्यास तत्पर तू ।। १ ।।
त्याग आणि समर्पण याचा सुरेख संगम तू,
स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्या,
घेतो आहेस कठोर परिश्रम तू ।। २ ।।
तळमळ, आज्ञापालन आणि त्याग या गुणांचे मीलन करूनी,
झालास सद्गुरु आणि संत यांचा आवडता गुरुसेवक तू ।। ३ ।।
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली चरणी हीच प्रार्थना आम्हा साधकांची,
करून घ्या जलद आध्यात्मिक प्रगती ओंकारची ।। ४ ।।
– श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५५ वर्षे), फोंडा, गोवा. (९.२.२०२५)
१. सौ. स्मिता कानडे (चि. ओंकारची आई, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. ‘ओंकारला मुळातच मायेविषयी आसक्ती अल्प आहे.
१ आ. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. संगीता जाधव यांची अनुभवलेली कृपा : ओंकार मुंबई येथे नोकरीसाठी गेल्यावर सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत) यांच्या माध्यमातून त्याला भगवंतच भेटला. तेव्हापासून त्याचे आयुष्यच पालटले.

१ इ. भगवंतरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरु आणि संत यांच्या माध्यमातून ओंकारला घडवणे
त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
अर्थ : हे गुरुदेवा, तूच माझी माता, पिता, बंधू, सखा, विद्या, धन, देव आणि सर्वस्व आहेस.
या उक्तीनुसार त्याच्यासाठी सर्वकाही सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू आहेत. भगवंतरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरु आणि संत यांच्या माध्यमातून ओंकारला घडवले.’ (२२.२.२०२५)
चि.सौ.कां. मृण्मयी गांधी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. वेळेचा सदुपयोग करणे
‘मृण्मयीची झोप अत्यल्प आहे. ती वेळ वाया घालवत नाही. ती वेळेचा पूर्ण उपयोग सेवा आणि साधना करण्यासाठी करते.
२. समाधानी आणि आनंदी
तिला खाण्यापिण्याची विशेष आवड नाही. तिला जे काही मिळेल, त्यात ती समाधानी आणि आनंदी असते.
३. तिची आश्रमातील सर्वच साधकांशी लगेच जवळीक होते.
४. सेवेची तळमळ
अ. ती तत्परतेने सेवा करते. ती प्रत्येक सेवा विचारून करते.
आ. तिची कोणतीही सेवा करण्याची सिद्धता असते आणि त्यामध्ये तिला कधीही न्यूनता वाटत नाही.
इ. मृण्मयी संतांच्या समवेत सेवा करायची. तिच्याकडून सेवांमध्ये चुका झाल्यास संत तिला चुकांची जाणीव करून देत असत. तेव्हा तिने ‘मला सेवा जमणार नाही’, असे कधीही सांगितले नाही. ती संतांकडे सेवेसाठी जाण्यासाठी नेहमीच सिद्ध असायची.
ई. ती ‘सेवेतील बारकाव्यांचा अभ्यास करून आणि संतांना सोयीचे होईल’, असा विचार करून सेवा परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते.
५. संतांप्रती भाव
तिच्यामध्ये गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.’
– सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी (११.२.२०२५)
उखाणे
वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे
वृंदावनात कृष्णाने खेळली गोपींसंगे रास ।
…..चे नाव घेतो प.पू. गुरुदेवांसाठी खास ।।
भीती नसे आम्हा संसाराची, असता गुरुकृपा ही पाठी ।
……च्या सोबत घडावी प्रत्येक कृती गुरुकार्यासाठी ।।