चि. अनमोल अरुण करमळकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. सौ. अनिता अरुण करमळकर आणि डॉ. अरुण शंकर करमळकर (चि. अनमोलचे आई-वडील), कोल्हापूर
१ अ. समंजस आणि प्रेमळ : ‘अनमोलची सर्वांशी लगेच जवळीक निर्माण होते. कुटुंबियांपैकी कुणी रुग्णाईत असल्यास तो त्यांची काळजी घेतो. सर्व नातेवाईक त्याचे नेहमी कौतुक करतात.
१ आ. त्याचे राहणीमान साधे आहे.
१ इ. ऐकण्याची वृत्ती : आम्ही त्याला काही कामे सांगितल्यास तो तत्परतेने कृती करतो.
१ ई. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे : त्याला आमच्या काही चुका लक्षात आल्यास तो आम्हाला त्याविषयी सांगतो आणि आम्हाला साधनेत साहाय्य करतो.
१ उ. सेवेची तळमळ : अनमोल प्रत्येक सेवा मनापासून आणि परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्याकडून झालेल्या चुका आणि आलेल्या अडचणी यांचा विचार करून ‘त्या चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी तो प्रयत्न करतो. तो अन्य साधकांना सेवेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो.
१ ऊ. गुरूंप्रती भाव : त्याचा प्रत्येक सेवा करतांना ‘गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच) माझ्याकडून सेवा करून घेणार आहेत’, असा भाव असतो.’
२. अन्य कुटुंबीय
२ अ. ‘अनमोल अतिशय शांत आणि मितभाषी आहे.
२ आ. प्रेमभाव : तो सर्व भावंडांमध्ये लहान असूनही तो घरातील सर्वांची मोठ्यांप्रमाणे काळजी घेतो.
२ इ. इतरांना साहाय्य करणे : आम्हाला सेवा करत असतांना संगणकीय अडचण आल्यास तो तत्परतेने सोडवतो. तो कार्यालयात असतांनाही आम्हाला येणारी संगणकीय अडचण प्राधान्याने सोडवतो.’
चि.सौ.कां. श्रेयाची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. श्रीमती शशिकला गुब्याड (चि.सौ.कां. श्रेयाची आई), सोलापूर
१ अ. सेवेची तळमळ : ‘एकदा श्रेयाची परीक्षा होती. तेव्हा परीक्षेच्या २ दिवस आधीपर्यंत ती सेवा करत होती. मी तिला ‘परीक्षा झाल्यानंतर सेवा कर’, असे सांगत होते. तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘सेवा आणि अभ्यास दोन्ही होईल.’’
२. सौ. स्नेहल केतन पाटील ( चि.सौ.कां. श्रेयाची मोठी बहीण, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २७ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे.
२ अ. बुद्धीमान : ‘श्रेया पुष्कळ बुद्धीमान आहे. ती बारावीत शिकत असतांना आम्हाला आर्थिक अडचण होती. त्यामुळे तिला शिकवणीसुद्धा लावली नव्हती. तेव्हा तिने जिद्दीने अभ्यास करून ८६ टक्के गुण मिळवले. त्या वेळी तिचा महाविद्यालयात प्रथम क्रमांक आला.
२ आ. प्रेमभाव : श्रेया आईला सर्व कामांत साहाय्य करते. ती सर्व भावंडांची पुष्कळ काळजी घेते.
२ इ. ती समोरच्या व्यक्तीशी लगेच जवळीक साधते. त्यामुळे ती बाहेरही सहजतेने सेवा करू शकते.
२ ई. कष्टाळू : ती बारावीत असतांना आमचे बाबा पुष्कळ रुग्णाईत होते. त्या वेळी त्यांचे ‘डायलिसीस’ (टीप) करावे लागायचे. श्रेया त्यांना घेऊन रुग्णालयात जात असे. ती रुग्णालयातच रात्री जागून बारावीचा अभ्यास करत असे. (टीप : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्यामुळे रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया)
२ उ. संतांप्रती भाव : तिचा सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत, वय ३६ वर्षे) यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. श्रेया साधना आणि सेवा यांसंदर्भात त्यांचे मार्गदर्शन घेते.’
२ ऊ. आमच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिने घराचे दायित्व स्वतःकडे घेतले.’
३. कु. शिवलीला गुब्याड ( चि.सौ.कां. श्रेयाची मधली बहीण)
३ अ. ‘श्रेयामध्ये साधनेची तळमळ आहे.
३ आ. ती सर्वांशी मोकळेपणाने बोलते.’
४. कु. सावित्री गुब्याड ( चि.सौ.कां. श्रेयाची लहान बहीण) आणि श्री. मल्लिनाथ गुब्याड, (चि.सौ.कां. श्रेयाचा लहान भाऊ), सोलापूर
४ अ.‘ती आम्हा भावंडांना समजून घेते.
४ आ. ताई आम्हाला नेहमी सांगते, ‘‘साधकांच्या संपर्कात रहा.’’
५. श्री. केतन कृष्णाजी पाटील (चि.सौ.कां. श्रेयाच्या मोठ्या बहिणीचे यजमान), सिंहगड रस्ता, पुणे.
५ अ. सेवेची तळमळ : ‘तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला ‘एम्.एस्.सी.’च्या विद्यार्थांना तिचे अनुभव सांगण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी तिने सर्वांना ‘साधनेमुळे तणावमुक्त राहून अभ्यास कसा करता येतो ? आणि आपल्यात सकारात्मकता कशी येते’, याविषयी सांगितले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ११.२.२०२५)
वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणेधर्म-अर्थ-काम-मोक्ष साधून पुरुषार्थ चार । ज्ञान आणि योग यांपेक्षा श्रेष्ठ आहे भक्ती । |