Somalia Merchant Ship Hijacked : सोमालियातील समुद्री लुटेर्‍यांनी व्यापारी नौकेचे केले अपहरण !

सोमालियातील समुद्रीचाच्यांनी (लुटेर्‍यांनी) अरबी समुद्रातील एका खासगी व्यापारी नौकेचे अपहरण केले आहे. यात १५ भारतीय कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने युद्धनौका पाठवली आहे.

Khalistani Attack Hindu Temple : अमेरिकेत पुन्हा एकदा खलिस्तान्यांनी केले हिंदु मंदिरावर आक्रमण !

खलिस्तानी आंतकवादी आणि भारतविरोधी गुरपतवंत सिंह पन्नु याच्यावर कारवाई न करणार्‍या अमेरिकेत याहून वेगळे काय घडणार ? अशा घटनांविषयी भारताने अमेरिकेला सज्जड भाषेत जाणीव करून देणे आवश्यक आहे !

Central Drug Regulatory Board : रक्ताच्या पिशवीसाठी आता केवळ प्रक्रियेवर झालेला खर्चच घेण्यात येणार !

केंद्रीय औषध नियामक मंडळाने रक्ताच्या पिशव्या पैसे घेऊन विकण्यावर बंदी घातली आहे. यामुळे आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालये यांना रक्ताची विक्री करता येणार नाही.

National Crime Records Bureau : ‘हिट अँड रन’च्या प्रकरणात बहुतांश आरोपी निर्दोष सुटतात ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग

गेल्या ५ वर्षांत हिट अँड रनच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. वर्ष २०१८ मध्ये प्रलंबितचे प्रमाण ९०.४ टक्के होते, तर वर्ष २०२२ मध्ये वाढून ९३ टक्के झाले.

North Korea Bomb Attack : उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर डागले २०० बाँब !

दक्षिण कोरियाने बेटावर रहाणार्‍या २ सहस्र लोकांना हा परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. दक्षिण कोरियाने या आक्रमणाचा निषेध केला असून याला ‘प्रक्षोभक कृती’ म्हटले आहे.

‘महानंद’ दूध डेअरी ‘राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डा’कडे जाणार !

सध्या ९३७ कामगार आहेत. त्यांपैकी ५६० कामगारांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘स्वेच्छा’ निवृत्तीकरता अर्ज केले आहेत; मात्र अद्यापही त्याविषयी निर्णय झालेला नाही. कर्मचार्‍यांचे वेतन वेळेत देता येत नाही.

पुणे येथील गेल्या ३ वर्षांतील विनाअनुमती बांधकामांचा आढावा घेणार ! – विक्रम कुमार, आयुक्त तथा प्रशासक

हा आढावा घेण्यास ३ वर्षे का लागली ? इतकी वर्षे प्रशासन झोपा काढत होते का ? त्या त्या वेळीच हा आढावा का घेतला नाही, याचेही कारण आयुक्तांनी सांगावे !

सिल्लोड येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची शिवीगाळ !

लोकप्रतिनिधींना जनता विकासकामे करण्यासाठी निवडून देते, नृत्यांगनांचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नव्हे. नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात तरुण हुल्लडबाजी करतातच, हे ठाऊक असूनही असे कार्यक्रम ठेवायचेच कशाला ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने !

देवतांविषयी अभद्र बोलणार्‍यांना जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल !

सर्व समस्यांवर एकच उत्तर : हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एक उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले