राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने !

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा कोल्हापूर जिल्ह्यात निषेध !

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी निषेध करण्यात आला.

१. मुरगुड येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, श्री. ओंकार पोतदार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ‘श्रीराम जन्मभूमी न्यास मुरगुड उपखंड प्रमुख’ श्री. तानाजी भराडे, शहरप्रमुख श्री. सर्जेराव भाट, मुरगुड मंडलप्रमुख श्री. प्रकाश परिशवाड, सर्वश्री जगदीश गुरव, सुभाष अनावकर, पृथ्वी चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांसह अन्य उपस्थित होते.

२. कोल्हापूर शहर सकल हिंदु समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या चित्रास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, सर्वश्री शरद माळी, जयवंत निर्मळ, हिंदुराव शेळके यांसह अन्य उपस्थित होते.


ठाणे येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन !

आंदोलनकर्त्या महिला

ठाणे, ४ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद सर्वत्र उमटत असतांनाच ठाणे येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेर आमदार आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

‘विनाशकाले विपरीतबुद्धी’ या उक्तीप्रमाणे महाविकास आघाडीचे वेडपट नेते यांनी प्रभु श्रीरामांसंदर्भात खोडसाळ विधान केले आहे. या वेडपट जितुद्दीनचे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून ठाणे येथील मनोरुग्णालयात आव्हाड यांना भरती करून घ्यावे. त्यांच्यासाठी एक खाट रिकामी ठेवावी’, अशी विनंती निवेदनाद्वारे मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे करण्यात आली.

एका तरुणाच्या चेहर्‍याला आव्हाड यांचे छायाचित्र लावत, गळ्यात फलक घालून रुग्णालयात नेण्यात आले. त्या फलकावर ‘मी जितेंद्र आव्हाड वेडा आहे. मला ॲडमिट करा’, असा उल्लेख करण्यात आला होता. या वेळी आंदोलनकर्त्यांनी ‘वेडा झाला रे… वेडा झाला, जितेंद्र आव्हाड वेडा झाला’ अशा घोषणा दिल्या.

ठाणे भाजप महिला मोर्चाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर आंदोलन

ठाणे येथील भाजप महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली आव्हाड यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कह्यात घेतले.


मिरज येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन !

 मिरज, ४ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा  जाहीर निषेध करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने ४ जानेवारी या दिवशी येथील महाराणा प्रताप चौकात ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले. या वेळी अनेक श्रीरामभक्त, भाजप, शिवसेना, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे जयगोंड कोरे म्हणाले की, सातत्याने राष्ट्रपुरुष, भगवान श्रीराम आणि महात्मा बसवेश्वर यांच्या संदर्भात गरळओक करणारे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा. या वेळी शिवसेनेचे श्री. प्रकाश जाधव, भाजपचे सर्वश्री अनिल रसाळ, भैय्या खाडीलकर, अमित सूर्यवंशी, उमेश हारगे, मोहन वाटवे, विक्रांत पाटील, तसेच महिला आघाडीच्या सौ. शोभा गाडगीळ, सौ. रूपाली देसाई, सौ. लतिका शेंगणे, सौ. साधना माळी, सौ. रेखा शेजवळ यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


पुणे येथे भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ ‘तिरडी’ आंदोलन !

(छायाचित्र सौजन्य : लोकसत्ता डॉट काम)

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या वक्तव्याविरोधात पुणे येथे भाजपकडून अलका चौकात ४ जानेवारी या दिवशी जोडेमारो आंदोलन करण्यात आले. आव्हाडांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. या वेळी आव्हाड यांच्या छायाचित्राला जोडे मारण्यात आले. तसेच त्यांची प्रतिकात्मक तिरडी करण्यात आली. आंदोलकांनी निषेध करणारे फलक हातात घेतले होते.

संपादकीय भूमिका :

देवतांविषयी अभद्र बोलणार्‍यांना जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल !