जीवितहानी नाही !
प्यांगयांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केले असून २०० बाँब डागले आहेत. हे बाँब थेट दक्षिण कोरियाच्या सीमेमध्ये पडलेले नाहीत. ते त्याच्या दक्षिणेकडील योगपेयोंग बेटाजवळ पडले. त्यामुळे दक्षिण कोरियाने बेटावर रहाणार्या २ सहस्र लोकांना हा परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. दक्षिण कोरियाच्या सैन्याने या आक्रमणाची माहिती दिली आहे. दक्षिण कोरियाने या आक्रमणाचा निषेध केला असून याला ‘प्रक्षोभक कृती’ म्हटले आहे.
सौजन्य : वनइंडिया न्यूज
#NorthKorea fires 200 rounds of artillery shells towards #SouthKorea !
No deaths reported!
DETAILS : These shellings didn't strike into the South Korean border; they struck Southern border island named Yeonpyeong.
South Korea has asked 2000 civilians to evacuate the island.… pic.twitter.com/0isjqhvmQD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 5, 2024
डिसेंबर २०२२ मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सीमेला लागून असलेल्या समुद्रात बाँबफेक केली होती. वर्ष २०१० मध्ये देखील उत्तर कोरियाने योनपेयोंग बेटावर आक्रमण केले होते ज्यात ४ जण ठार झाले होते. अलीकडेच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांमध्ये तणाव न्यून करण्यासाठी करार झाले होते; मात्र आताच्या आक्रमणामुळे हे करार संपुष्टात आले आहेत.