आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ !
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर १ किलोला ५५ ते ६० रुपये किलो झाले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर १ किलोला ५५ ते ६० रुपये किलो झाले आहेत.
येथे पतंग उडवतांना नायलॉन मांजामुळे मांडीला गंभीर दुखापत होऊन अतीरक्तस्रावामुळे विष्णु जोशी (वय ९ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला. पतंग खेळणार्या मुलांना पहात असतांना नायलॉन मांजा विष्णूच्या मांडीत अडकला. गुडघ्याच्या मागून रक्तस्राव होऊ लागला.
ढगाळ वातावरण, सूर्यकिरणांची तीव्रता अल्प असणे, वातावरणातील धुलीकण यांमुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात तिसर्या दिवशी सूर्यकिरण केवळ चांदीच्या द्वारापर्यंत पोचल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही.
प्रा. साठे यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र पालट घडवून आणण्यासाठी उपयोगी असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरसोबतच स्वतःच्या आयुष्याला योग्य ती दिशा देण्याची प्रेरणा मिळणार आहे
या घटनेतून राज्यातील कायद्याचा आणि पोलिसांचा धाक संपला आहे, हे लक्षात येते. पोलीस स्वत:ची स्थिती केव्हा सुधारणार ?
छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिला, मुली यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही दु:स्थिती पोलिसांना लज्जास्पद !
सनातन संस्थेचे प्रेरणास्थान असणारे प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव २६ ऑक्टोबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत साजरा करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
श्री विठ्ठल, श्री रुक्मिणीमाता यांची शासकीय महापूजा यंदा आचारसंहितेमुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे.
अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
६२३ घुसखोरांपैकी ५२ रोहिंग्या आणि ५७१ बांगलादेशी आहेत. सीमा सुरक्षा दलाने या घुसखोरांकडून ८७ कोटी रुपयांचे अमली पदार्थही जप्त केले आहेत.