तिसर्‍या दिवशी किरणोत्सव नाही !

ढगाळ वातावरणामुळे तिसर्‍या दिवशी सूर्यकिरण केवळ चांदीच्या द्वारापर्यंत !

श्री महालक्ष्मीदेवीची करण्यात आलेली विशेष पूजा 

कोल्हापूर, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – ढगाळ वातावरण, सूर्यकिरणांची तीव्रता अल्प असणे, वातावरणातील धुलीकण यांमुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात तिसर्‍या दिवशी सूर्यकिरण केवळ चांदीच्या द्वारापर्यंत पोचल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही. यंदा किरणोत्सव केवळ पहिल्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबरलाच होऊ शकला होता. ढगाळ वातावरणामुळे तो १० नोव्हेंबरला झाला नाही. या संदर्भात ‘देवस्थान समिती’चे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे म्हणाले, ‘‘१२ आणि १३ नोव्हेंबरलाही आम्ही किरणोत्सवाची चाचणी घेणार असून नेमके अडथळे कोणत्या कारणांमुळे आहेत ? याचा अभ्यास करणार आहोत.’’