१० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी !
शिरूर (जिल्हा पुणे) – येथील विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. आमदार पवार यांचा मुलगा ऋषिकेश पवार यांचे अपहरण झाल्यावर एका बंगल्यात अनोळखी स्त्रीला बोलावून दोघांनाही विवस्त्र करून छायाचित्रे काढून आणि छायाचित्रीकरण करून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (या घटनेतून राज्यातील कायद्याचा आणि पोलिसांचा धाक संपला आहे, हे लक्षात येते. पोलीस स्वत:ची स्थिती केव्हा सुधारणार ? – संपादक)
यासंदर्भात अधिवक्ता असीम सरोदे आणि आम्रपाली पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेला प्रसंग सांगितला. ‘हा प्रसंग अतिशय घृणास्पद आहे. निवडणुका लोकशाही पद्धतीने लढवायला हव्यात. असे कृत्य करून कुटुंबाला वेठीस धरणे, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. पोलिसांनी या प्रकारामागील सूत्रधाराचा शोध घ्यावा’, असे आमदार अशोक पवार यांनी लोणी काळभोर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.