भारतियत्वाचे शिक्षण केवळ भारतात नव्हे, तर संपूर्ण विश्वात द्यायला हवे !

दिलीप केळकर

एखादा विषय शिकवायचा असेल, तर तो सखोलपणे शिकवावा लागतो. वर्तमान शिक्षणात जे काही शिकवले जाते, ती इंग्रजांनी बनवलेली शिक्षणपद्धत आहे. त्यात भारतीय शिक्षणाचा अंतर्भाव नाही. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत.), ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) आणि अष्टांग योगाचे यम-नियम ही भारतीय जीवनपद्धतीची ओळख आहे. भारतियत्वाचे हे शिक्षण केवळ भारतात नव्हे, तर संपूर्ण विश्वात द्यायला हवे. आपल्याला वैश्विक शिक्षण देण्यासाठी शिक्षणपद्धत सिद्ध केली पाहिजे. सध्या संपूर्ण शिक्षणपद्धतीच परिवर्तनाच्या टप्प्यावर आलेली आहे. शिक्षण हे जीवनभराचे शिक्षण असते. शिक्षणातून समग्र जीवनाचा विचार कसा केला जाऊ शकतो ? हे सांगितले पाहिजे.

– श्री. दिलीप केळकर, अखिल भारतीय संयोजक, भारतीय शिक्षण मंच.