१. ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात संतांसाठी महाप्रसाद बनवण्याची सेवा करते. जेव्हा मी प्रथम भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडेगुरुजींना पाहिले, तेव्हा त्यांचा हसरा चेहरा आणि स्थिरता पाहून ‘ते संतच आहेत’, असे मला वाटत होते. ‘त्यांच्याकडून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते. ‘त्यांच्यासाठी कोणताही पदार्थ बनवून ठेवत असतांना माझ्या डोळ्यांसमोर ‘पू. शेवडेगुरुजी’, असे आपोआप येत असे. असे ८ दिवस वारंवार होत होते.
२. ११.६.२०२४ या दिवशी ‘आज ते नक्की संत म्हणून घोषित होणार’, असे वाटून मला आनंद जाणवत होता. ‘मी बनवलेला महाप्रसाद त्यांना आवडला’, हे कळल्यावर माझा कृतज्ञताभाव दाटून आला. त्यानंतर मला ते संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता समजली.
‘हे गुरुमाऊली, ‘तुमच्याच कृपेमुळे मला सतत संतांचा सहवास आणि त्यांच्यासाठी महाप्रसाद बनवण्याची सेवा मिळत आहे. याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. आशा होनमोरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |