धर्मकार्यात सहभागी होण्‍यासाठी बोकारो (झारखंड) येथील एक धर्माभिमानी युवक सायकलने ७ घंटे प्रवास करून रांची येथे येणे !

श्री. शंभू गवारे

‘काही दिवसांपूर्वी रांची (झारखंड) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती बैठकी’ चे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला बोकारो (झारखंड) येथून २३ वर्षांचा एक युवक आला होता. त्‍याच्‍याशी बोलतांना माझ्‍या लक्षात आले, ‘तो युवक बोकारो येथून सायकल चालवत आला होता. बोकारो ते रांची हे अंतर ११३ किलोमीटर आहे.’ तो युवक मला म्‍हणाला, ‘‘मी सकाळी ७ वाजता बोकारो येथून निघालो आणि मला सायकलने येथे पोचायला ७ घंटे लागले. मला हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यात सहभागी होऊन हिंदू आणि हिंदु राष्‍ट्र यांसाठी काहीतरी करण्‍याची इच्‍छा आहे; म्‍हणून मी आलो आहे.’’ तेव्‍हा ‘ईश्‍वरी कार्य ईश्‍वराच्‍या नियोजनानुसार होणारच आहे आणि या दैवी कार्यात कुणी सहभागी व्‍हावे ?, हेही ईश्‍वराचेच नियोजन आहे’, याची मला जाणीव झाली अन् गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.’

– श्री. शंभू गवारे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ४७ वर्षे), धनबाद, झारखंड. (१२.९.२०२४)