६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया सुरजीत माथूर साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधकांना ‘सुप्रियाताईंमध्ये कोणते पालट जाणवत आहेत ?’, याविषयी झालेल्या संभाषणाचा काही भाग १९ नोव्हेंबरला पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/855956.html
३. ‘सुप्रियाताईने पुष्कळ चांगले प्रयत्न करून स्वतःत पालट केला आहे’, असे साधिकांनी सांगणे
कु. रजनीगंधा कुर्हे : सुप्रियाताईंनी सांगितले, ‘‘काही साधकांना त्यांच्या आढाव्यांचा ताण येतो.’’ मी सुप्रियाताईंच्या १ – २ आढाव्यांना उपस्थित होते. त्या वेळी ज्या साधकांचा आढावा घ्यायचा होता, त्यांच्या चेहर्यावर कोणताही ताण नव्हता. ताईंच्या सांगण्यात पुष्कळ सहजता होती. मी ताईंना पूर्वी आढावा घेतांना पाहिले आहे. आता ताईंमध्ये पुष्कळ पालट झाला आहे. त्यांनी पुष्कळ चांगले प्रयत्न केले आहेत.
आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. कस्तुरी भोसले : ‘सुप्रियाताईमधील प्रेमभाव पुष्कळ वाढला आहे’, असे मलाही जाणवले. मी तिच्यापेक्षा वयाने पुष्कळ मोठी असूनही ती पुष्कळ जवळिकीने माझ्याजवळ आली आणि माझा हात धरून तिने विचारले, ‘‘काकू, तुम्ही कशा आहात ?’’ तिने पहिल्यांदाच मला असे विचारले. त्यामुळे मला पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘सुप्रियाताई’ म्हटले की, सगळ्यांना दडपण येतेे; पण मला त्या भेटीत तसे काही वाटलेच नाही.
सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘साधकांना सुप्रियाताईंची भीती का वाटते ?’, याविषयीचे अचूक उत्तर देताच ‘आता साधकांची भीती न्यून झाली आहे ना ?’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारणे
सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : सुप्रियाताई साधकांच्या मनातील सर्व ओळखतात ना ! त्यामुळे साधकांना अधिक भीती असते की, त्या आता आपल्याविषयी काय सांगतील ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता साधकांची भीती थोडी न्यून झाली आहे ना ?
सौ. सुप्रिया माथूर : हो. आता काही साधक सांगतात की, आम्हाला ताण आला नाही. मी माझ्या दृष्टीनेही विचार करते की, ‘कोणकोणत्या कारणांमुळे समोरच्याला ताण येऊ शकतो.’
४. ‘पत्नीमध्ये पालट झाले आहेत’, असे श्री. सुरजीत माथूर यांनी सांगताच पूर्वी ‘ती ‘नवरा’ म्हणून कि ‘साधक’ म्हणून तुमच्याकडे पहायची ?’ असे परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारणे
श्री. सुरजीत माथूर : पूर्वीपेक्षा सुप्रियात (पत्नीमध्ये) पुष्कळ पालट झाले आहेत. पूर्वी ती पुष्कळ कठोरपणे चुका सांगायची. आता ती स्पष्टपणे सांगते. त्यामुळे मलाही पूर्वीसारखा ताण येत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पूर्वी ती ‘नवरा’ म्हणून तुमच्याकडे बघायची कि ‘साधक’ म्हणून पहायची ?
५. सौ. सुप्रिया माथूर यांनी यजमानांना, तसेच साधकांना कठोरतेने चुका सांगत असल्याचे मान्य करून त्यामागची विचारप्रक्रिया सांगणे आणि साधकांचा आढावा घेण्यामुळे होत असलेल्या लाभाविषयी सांगणे
सौ. सुप्रिया माथूर : मी यजमान श्री. सुरजीत यांना त्यांच्या चुका अन्य साधकांच्या तुलनेत अधिक कठोरतेने सांगायचे. त्यांच्याकडून चुका व्हायच्या आणि मी त्यांना त्या चुकीच्या पद्धतीने सांगायचे. त्या वेळी ‘साधकांना त्यांच्या चुका कठोरपणाने सांगितल्या, तरच त्यांना त्या समजतील आणि चुकांमध्ये ते सुधारणा करतील’, अशी माझी मानसिकता असायची. त्या वेळी कठोरतेने बोलल्यामुळे समोरच्याला ताण येऊन त्याच्या मनात नकारात्मकता निर्माण व्हायची आणि मलाही निराशा येऊन असे वाटायचे की, ‘आपल्याला साधकांना हाताळता येत नाही. त्यामुळे ‘आपण ही सेवा करायलाच नको.’ माझ्या मनात असे टोकाचे विचार यायचे. आता मात्र असे विचार येतात की, ‘मी समष्टी सेवा करते; म्हणून मला हे अडथळे समजतात. केवळ ‘मी आणि माझी सेवा’, अशी व्यष्टी साधना मी केली असती, तर मला हे अडथळे कधी कळले नसते.’
पूर्वी माझ्या मनात यायचे, ‘साधकांना चुका सांगणे आणि त्यांचा सत्संग घेणे’, या सेवा मला आवडत नाहीत, तरी या सेवा मला का दिल्या आहेत ?’, काही वर्षांनी माझ्या लक्षात आले की, ‘या सेवा मला मिळाल्या नसत्या, तर आध्यात्मिक स्तरावर नेमके कुठे अडथळे आहेत’, हे मला कळलेच नसते. आता आढावा घेतांना कळते की, एखाद्या साधकाच्या मनातही ‘माझ्या मनात येतात’, तसेच विचार येतात. तेव्हा मीही ‘कोणते प्रयत्न करायला पाहिजेत ?’, ते मला समजते. आध्यात्मिक स्तरावर चिंतन करायला लागल्यावर ‘माझे आणि समोरच्या साधकाचे अंतर्मुख होण्याचे प्रमाण वाढते’, हेही माझ्या लक्षात आले. (क्रमश:)
(सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगातील संभाषण)