सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या निमित्त मध्‍यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती  

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्‍या आज्ञेने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. त्‍याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्‍यप्रदेशामधील साधकांना आलेल्‍या अनुभूती १९ नोव्‍हेंबर या दिवशी पाहिल्‍या. आज उर्वरित भाग पाहूया.

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/855945.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

८. सौ. वैदेही पेठकर, ग्‍वाल्‍हेर

८ अ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे स्‍मरण होऊन कृतज्ञताभाव जागृत होणे : ‘११.५.२०२३ या दिवशी, म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी सकाळीच ‘गुरुदेवांनी आम्‍हाला किती दिले आहे ! आणि प्रत्‍येक क्षणी कसे सांभाळले आहे’, याचे स्‍मरण होऊन माझ्‍या मनात कृतज्ञताभाव जागृत होत होता. त्‍या वेळी माझ्‍या मनात ‘धन्‍य धन्‍य हम हो गए गुरुदेव ।’ ही ओळ सतत येत होती. माझे मन निर्विचार होऊन सर्व सेवा शांतपणे होत होत्‍या.

८ आ. ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी मी शांतता आणि शीतलता अनुभवत होते. ‘जणू काही मी ब्रह्मोत्‍सवाच्‍या ठिकाणी प्रत्‍यक्ष उपस्‍थित आहे’, असे जाणवून मला आनंद होत होता. मला केवळ कृतज्ञताच वाटत होती.

९. श्री. विवेक पेठकर, ग्‍वाल्‍हेर

अ. ‘मला ब्रह्मोत्‍सव पहाता येण्‍यासाठी सुटी मिळण्‍याची अडचण होती. मी प्रार्थना केल्‍यानंतर मला सहजतेने सुटी मिळाली.

आ. मी संपूर्ण ब्रह्मोत्‍सवात निर्विचार स्‍थिती अनुभवत होतो. माझा सतत नामजप होत होता.

मी तिन्‍ही मोक्षगुरूंच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या) चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

१०. श्री. आनंद जाखोटिया (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ३८ वर्षे), उज्‍जैैन 

१० अ. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेे यांना आनंद देण्‍यासाठी काहीच करू शकत नाही’, याची खंत वाटून ‘त्‍यांच्‍या प्रती कृतज्ञता कशी व्‍यक्‍त करू’, या विचाराने मन दाटून येणे अन् त्‍यांनाच प्रार्थना होणे : ‘मला काही दिवसांपासून ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेे यांना आनंद देण्‍यासाठी मी काहीच करू शकत नाही’, याची खंत वाटत होती. ‘त्‍यांच्‍या प्रती कृतज्ञता किती आणि कशी व्‍यक्‍त करू’, या विचाराने माझे मन दाटून येत असे. त्‍या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना करत असे, ‘आपण मला साधनेचे प्रयत्न वाढवण्‍याची उर्मी आतून देता; पण माझ्‍याकडून तेवढे प्रयत्न होत नाहीत. माझ्‍याकडे काही कला किंवा गुणही नाहीत, जे मी आपल्‍याला अर्पण करून आनंद देऊ शकेन. तुम्‍हीच माझ्‍याकडून प्रयत्न करून घ्‍या. मी असमर्थ आहे.’

१० आ. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांचे मार्गदर्शन अन् नियोजन यांमुळे श्री गुरूंचा ब्रह्मोत्‍सव होऊ शकल्‍याने त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त होणे : ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना रथारूढ पाहून मला पुष्‍कळ आनंद झाला. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी इतके सुंदर मार्गदर्शन आणि नियोजन करून घेतल्‍यामुळे ही श्री गुरूंची रथयात्रा होऊ शकली’, त्‍याबद्दल माझी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली. ‘तुम्‍ही सर्व आहात. त्‍यामुळे माझ्‍या श्री गुरूंची अशी सुंदर रथयात्रा होत आहे’, अशी या उत्‍सवातील साधक, रथ, रथाला ओढणारी दोरी, ध्‍वज या सर्वांप्रती माझ्‍याकडून कृतज्ञता व्‍यक्‍त होत होती.

१० इ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या प्रती व्‍यक्‍त झालेली कृतज्ञता ! : माझ्‍याकडून महर्षींच्‍या प्रती कृतज्ञता व्‍यक्‍त झाली, ‘आपल्‍यामुळे आम्‍हाला आपल्‍या योगमायेने सर्व करूनही नामानिराळे रहाणार्‍या श्री गुरूंचा ब्रह्मोत्‍सव करता आला आणि पहायलाही मिळाला.’ माझ्‍याकडून गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, तुम्‍ही आम्‍हाला शिकवले नसते, तर आम्‍ही हा सुंदर उत्‍सव कधीच करू शकलो नसतो. ईश्‍वराने गंध, पुष्‍प आदी सुंदर गोष्‍टी निर्माण केल्‍या नसत्‍या, तर आपण देवाचे पूजन कसे केले असते ? तसे हे गुरुदेवा, आपण आम्‍हाला घडवले नसते, तर आम्‍ही आपले पूजन कसे केले असते ? आम्‍ही या उत्‍सवातील एकेक गोष्‍ट केवळ ‘आपली शिकवण आणि आपण आमच्‍यावर केलेले संस्‍कार’ यांमुळेच करू शकलो. आपण या कलियुगात दिव्‍य अशी सनातन धर्माची सृष्‍टी निर्माण केली. केवळ सृष्‍टीच नाही, तर या सृष्‍टीला असेच वर्धिष्‍णु करणार्‍या अनेक जिवांना तुम्‍ही घडवले आहे. आपल्‍या संकल्‍पाने घडलेले सात्त्विक, चैतन्‍यमय, परिपूर्ण असे सद़्‍गुरु, संत आणि साधक यांच्‍या माध्‍यमातून हिंदु राष्‍ट्राचा वटवृक्ष आकार घेईल, त्‍या वेळी कृतज्ञतेचा अत्‍युच्‍च भाव आम्‍ही खर्‍या अर्थाने अनुभव करू शकू. आपल्‍या या अवतारी कार्यात आपणच आमचे संपूर्ण समर्पण करून घ्‍या. ‘आपल्‍या भक्‍तीने ओथंबलेल्‍या प्रत्‍येक साधक जिवाला आपले असेच प्रत्‍यक्ष दर्शन देणारा उत्‍सव आम्‍हाला वारंवार साजरा करता यावा.’(समाप्‍त)

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २४.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक