१. गोवा येथील नवीन वास्तूत स्थलांतरित झाल्यावर तिथे दाब जाणवणे आणि घरात कुणीतरी वावरत आहे’, असे जाणवणे
‘आम्ही कोरोना महामारीच्या कालावधीत (मी, माझी आई (सौ. सविता तिवारी, वय ७३ वर्षे) आणि माझी भाची (कु. कनक मिश्रा, वय १८ वर्षे) गोवा येथे स्थलांतरित झालो. आमच्यासाठी ती वास्तू नवीन होती. मला त्या वास्तूत पुष्कळ दाब जाणवत होता. मी झोपलेले असतांना मला कुणीतरी स्पर्श करून उठवत असे; परंतु जाग आल्यावर मला आजूबाजूला कुणी दिसायचे नाही. ‘घरात कुणीतरी वावरत आहे’, असे मला जाणवायचे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र वास्तूत ठेवणे आणि प्रार्थना करून आध्यात्मिक उपाय करणे
आम्हाला दळणवळण बंदीमुळे वास्तूत पूजा किंवा इतर कोणतेही धार्मिक विधी करता येत नव्हते; म्हणून आम्ही वास्तूत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवले होते. आम्ही त्यांना प्रार्थना करून शक्य तेवढे आध्यात्मिक उपाय (उदबत्ती, धूप आणि स्तोत्र नियमित लावणे, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावणे) नियमित करत होतो.
३. वैजयंती मण्यांच्या जपमाळेच्या संदर्भात आलेल्या त्रासदायक अनुभूती
३ अ. वैजयंती मण्यांची जपमाळ घेऊन नामजप करत असतांना ‘त्या जपमाळेचा वापर करू नये’, असे वाटणे आणि जपमाळेकडे पाहिल्यावर एखाद्या पडक्या अन् त्रासदायक घराचे दृश्य दिसणे : ‘माझ्याकडे वैजयंतीच्या १०८ मण्यांची जपमाळ आहे. मी वर्ष २०२० पासून त्या जपमाळेवर ‘कोरोना महामारीच्या संसर्गापासून रक्षण व्हावे’, यासाठी सांगितलेला नामजप करत होते. वर्ष २०२१ मध्ये ती जपमाळ घेऊन नामजप करत असतांना मला ‘त्या जपमाळेचा वापर करू नये’, असे वाटत होते. त्या जपमाळेकडे पाहिल्यावर मला एखाद्या पडक्या आणि त्रासदायक घराचे दृश्य दिसत होते.
३ आ. जपमाळेतील एका मण्यावर ‘अनिष्ट शक्तीचा तोंडवळा उमटला आहे’, असे दिसणे आणि जपमाळेकडे पाहिल्यावर प्राणशक्ती उणावणे : माझी जपमाळ वैजयंती मण्यांची होती, तरी मला ‘त्रासदायक का वाटते ?’, असा मला प्रश्न पडला होता; म्हणून मी जपमाळेचे निरीक्षण केले. त्या वेळी जपमाळेतील एका मण्यावर ‘अनिष्ट शक्तीचा तोंडवळा उमटला आहे’, असे मला दिसले. त्या वेळी ‘जपमाळेकडे पाहिल्यावर माझी प्राणशक्ती उणावत आहे’, असे माझ्या लक्षात आले. तसेच त्या जपमाळेकडे पहातांना मला पुष्कळ त्रासदायक स्पंदने जाणवत होती.
४. घरातील नेहमीच्या वापरातील कपाला तडा जाणे
४ अ. कपात दूध ओतल्यावर ‘तो विचित्र प्रकारे फुटला आहे’, असे लक्षात येणे : एकदा मी कपात दूध ओतले, तर ‘तो कप फुटला आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी तो कप ‘पडला आहे किंवा त्याला तडा गेला आहे’, असे काहीच झालेले नव्हते, तरी तो ‘विचित्र प्रकारे फुटला आहे’, असे माझ्या लक्षात आले. तो कप कुणीतरी खालून थोडा वरच्या बाजूला सुरीने किंवा ‘कटर’ने कापला आहे, अशा प्रकारे तो फुटला होता.
४ आ. ‘कप विचित्र प्रकारे फुटला आहे’, हे पाहून ‘अनिष्ट शक्ती आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असून हे त्यांनी केलेले आक्रमणच आहे’, असे मला वाटले.
आम्ही रहात असलेल्या वास्तूतील त्रासाचे प्रमाण आता उणावले असून ‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे या वास्तूत दैवी वातावरण निर्माण झाले आहे’, त्याबद्दलप.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’
– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, फोंडा, गोवा.
|