उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वेदिका संतोष देसाई ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. वेदिका संतोष देसाई उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१३.११.२०२४)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. शिकण्याची आवड
‘वेदिका ३ वर्षांची असतांना तिला शिकवल्याप्रमाणे तिने रांगोळी काढून त्यामध्ये ‘सनातन प्रभात’ असे लिहिले. ती मंदिराचे चित्र काढायची. तिला एकदाच ‘मातीचा गणपति कसा बनवायचा ?’, याविषयी सांगितले. त्याप्रमाणे तिने लगेच मातीचा गणपती बनवला. ती पोहायला आणि सायकल चालवायला लगेच शिकली. तिला विविध पाककृती करून पहाण्यात रूची आहे. ती ६ वर्षांची असतांना तिने पुरणपोळी बनवली होती.
२. वेदिका आम्हाला घरकामात साहाय्य करते, उदा. लादी पुसणे, भांडी घासणे.
३. शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी
तिच्या शाळेचे मुख्याध्यापक वेदिकाला म्हणतात, ‘‘तू शाळेच्या नियमांचे पालन करतेस.’’ काही शिक्षिका वेदिकाला ‘तू आमची आवडती विद्यार्थिनी आहेस’, असे सांगतात.
४. आमच्या घरी साधक आल्यावर तिला आनंद होतो. तिला ‘साधकांनी नियमित घरी यावे’, असे वाटते.
५. सेवेची आवड
ती आम्हाला नवरात्रीच्या कालावधीत ग्रंथप्रदर्शन लावण्याच्या सेवेत साहाय्य करते. तिने तिच्या शिकवणीवर्गातील शिक्षक, आम्हाला दूध देणारी व्यक्ती, आमचे शेजारी आणि तिच्या मैत्रिणी यांना सनातन पंचागांचे वितरण केले.
६. संत आणि गुरु यांच्याप्रती भाव
अ. वेदिका तिच्या अभ्यासाच्या कपाटातील खणात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र ठेवते. ‘हे चित्र आणि छायाचित्र स्वतःच्या कपाटात आणि वस्तूंच्या समवेत नेहमी असायला हवे’, असा तिचा भाव असतो.
आ. ती प्रतिदिन देवपूजा करतांना गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आळवते.
इ. ती वहीत नामजप लिहिते. तेव्हा ‘गुरुदेव ही वही पहाणार आहेत’, असा तिचा भाव असतो.
ई. कधीकधी तिला सद़्गुरु स्वाती खाडये आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण येते. ‘सद़्गुरु स्वातीताई आपल्या घरी कधी येणार ?’, असे ती विचारते. एकदा सद़्गुरु स्वातीताई आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती नऊवारी साडी नेसण्याचा सराव करत आहेे.
७. चुकांविषयी संवेदनशील
तिच्याकडून काही चुका झाल्यास ती आम्हाला त्याविषयी सांगते.
८. स्वभावदोष
हट्टीपणा आणि ऐकण्याची वृत्ती अल्प.’
– सौ. अश्विनी संतोष देसाई आणि श्री. संतोष देसाई (कु. वेदिकाचे आई-वडील), सांगली (४.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |