पत्नीला साधनेत साहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे चिंबल (गोवा) कै. अशोक वासुदेव नाईक (वय ७१ वर्षे) !

एखाद्या दिवशी दैनिक विलंबाने आले, तर ते बेचैन होत असत. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संगच आहे’, असे त्यांना वाटत असे.

‘उत्तरदायी साधिका’ म्हणून नव्हे, तर ‘गुरुसेवेसाठी आलेली सेवेकरी साधिका’ या भावाने सेवा करणार्‍या सुश्री (कु.) सुषमा लांडे (वय ४० वर्षे) !

काही साधकांमध्ये सेवा उरकण्याची वृत्ती असते. त्या वेळी ताई त्यांच्या चुका लक्षात आणून देते. ती म्हणते, ‘‘आपण सेवा किती करतो ?’, यापेक्षा ‘ती सेवा कशी करतो ?’, याकडे देव पहात असतो.

पू. सौरभ जोशी यांची पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी रुग्णाईत असल्याच्या संदर्भात सूक्ष्मातून जाणण्याची अफाट क्षमता !

पू. सौरभदादांना पू. दातेआजींचे छायाचित्र दाखवल्यावर पू. दादांनी पू. आजी समोर असल्याप्रमाणे छायाचित्रातील पू. आजींना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

आजारी असूनही सतत आनंदावस्थेत असणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  पू. आजींवर नामजपादी उपाय करतात, हे मला समजले. तेव्हा पू. आजींची भक्ती किती उच्च कोटीची आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि माझी भावजागृती झाली.

मंदिर जतन-संवर्धनाची कामे पुरातत्व विभाग, संबधित कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण करावीत ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता, तसेच मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून चालू आहे.

कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना सुचलेल्या काव्यपंक्ती

‘२४.२.२०२४ या दिवशी सारणीलिखाण करत असतांना गुरुदेवांनी जो दृष्टीकोन सुचवला, त्या विचाराने माझा भाव पुष्कळ जागृत झाला आणि पुढील काव्यपंक्ती गुरुदेवांनी सुचविल्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘एकदा मला प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. तेथे जातांना ‘मी ब्रह्मांडाच्या पोकळीतून जात आहे’, असे मला जाणवले…

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा होत असतांना साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

‘सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस असतो. २५.९.२०२२ या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा होतांना मी अनुभवलेल्या भावस्थितीबद्दलची माहिती येथे दिली आहे.

नारायणाच्या दिव्य स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी तळमळीने प्रार्थना करणार्‍या रामनाथी (गोवा) आश्रमातील सौ. अनन्या पाटील !

तुझे एकदा घेतलेले नाम, म्हणजे एक खरा श्वास घेणे आहे. हे नारायणा, ज्याप्रमाणे देहाचा श्वास बंद झाला, तर त्या क्षणी देह निष्प्राण होतो, तसेच माझ्या आत्म्याचे आहे. तुझ्या नामाचा श्वास घेतला नाही, तर हे भगवंता, मी अनिष्ट शक्ती आणि भवसागर यांमध्ये अनंत काळ बुडून जाईन…

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर गुरुरूपात लाभल्याने जीवनात आमूलाग्र पालट अनुभवणार्‍या मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथील सौ. शीलादेवी गावडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८५ वर्षे) !

माझ्या अनेक जन्मांच्या भाग्यामुळे कि काय, वर्ष १९९८ मध्ये मला ‘सनातन संस्थे’च्या सत्संगाचा लाभ झाला. त्यानंतर माझ्या जीवनात आमूलाग्र पालट होऊ लागले. उपवास, व्रत-वैकल्ये आदी कर्मकांडे माझ्याकडून श्रद्धेने आणि भावपूर्ण रीतीने होऊ लागली…