कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना सुचलेल्या काव्यपंक्ती

           ‘२४.२.२०२४ या दिवशी सारणीलिखाण करत असतांना गुरुदेवांनी जो दृष्टीकोन सुचवला, त्या विचाराने माझा भाव पुष्कळ जागृत झाला आणि पुढील काव्यपंक्ती गुरुदेवांनी सुचविल्या.

कु. रजनीगंधा कुर्‍हे

गुरुदेव हात न सोडला कधी तुम्ही ।
मग वाट कशीही आली जीवनी ।
तुमचे आश्वासक शब्द अन् सुहास्य ।
नेहमी प्रेरणा देऊन लढण्यास पात्र केले प्रत्येक क्षणी ।। १ ।।

एकटेपणाच्या क्षणात धीर देऊनी मनास ।
हात घट्ट धरून सावरले प्रत्येक क्षणात ।
भावनेतून भावाकडे अन् ।
भावातून भक्तीकडे नेले टप्प्याटप्प्यांत ।। २ ।।

गुरुदेव काय वर्णू तुमची महती ।
प्रत्येक साधक ती अनुभवतो त्याच्या अंतरी ।
मायेपासून अलिप्त करूनी ।
मायेतील ब्रह्म अंतरी कसे वसे हे दाविले तुम्ही ।। ३ ।।

चुका अनेक झाल्या जरी त्या पदरी घेऊनी ।
पुन्हा लढ म्हणून कटीबद्ध केले तुम्ही ।
गुरुदेव हात न सोडला कधी तुम्ही ।
हात न सोडला कधी तुम्ही ।। ४ ।।’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक