‘सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. श्री. प्रशांत हरिहर हे काही सेवेनिमित्त रामनाथी आश्रमात आले आहेत. २९.७.२०२४ या दिवशी पू. दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पू. आजींकडून ‘आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवणे : ‘पू. आजींना पाहिल्यावर ‘त्या आजारी आहेत’, असे मला वाटत नव्हते. पू. आजी आनंदात असून त्यांच्याकडून ‘आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.
२. पू. दातेआजींनी डोळे उघडताच ‘देवाचे दर्शन झाले’, असे वाटून आनंद होणे आणि मन निर्विचार होणे : पू. दातेआजी ‘काही वेळा डोळे उघडतात’, असे मला समजले. तेव्हा माझ्या मनात त्यांनी ‘डोळे उघडावेत आणि त्यांची दृष्टी आम्हा साधकांवर पडावी’, असा विचार येत होता. त्या वेळी त्यांनी लगेच डोळे उघडले. तेव्हा ‘देवाचे दर्शन झाले’, असे मला वाटले आणि आनंद झाला. नंतर माझे मन निर्विचार झाले.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. आजींवर नामजपादी उपाय करतात, हे मला समजले. तेव्हा ‘पू. आजींची भक्ती किती उच्च कोटीची आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि माझी भावजागृती झाली.
४. ‘पू. आजींच्या खोलीत आश्रमातील अन्य खोल्यांपेक्षा अधिक प्रकाश आहे’, असे मला जाणवले.
५. ‘पू. आजींच्या खोलीतून बाहेर येतांना एका विशाल पोकळीतून बाहेर येत आहे’, असे मला जाणवले.’
– श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू, कर्नाटक. (३०.७.२०२४)