सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. सत्संगाला जाण्यापूर्वी
अ. ‘एकदा मला प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. तेथे जातांना ‘मी ब्रह्मांडाच्या पोकळीतून जात आहे’, असे मला जाणवले.
आ. त्या वेळी मला माझ्या अंतर्मनात पुष्कळ आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी अनुभवता आल्या.
२. सत्संगाच्या ठिकाणी आल्यावर
अ. ‘मी ब्रह्मांडातील विष्णुलोकात आले आहे’, असे मला वाटत होते.
आ. मला सूक्ष्म गंधाची अनुभूती येऊन माझ्या श्वासाची गती संथ झाली.
इ. माझा नामजप अंतर्मनातून चालू झाला.
ई. त्या वेळी माझे मन निर्विचार अवस्थेत होते.
‘गुरुकृपेने मला या अनुभूती आल्या आणि गुरूंची अपार कृपा अनुभवता आली’, याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती भारती पद्मन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|