वारी : भावभक्तीचा महासागर !

‘विठुमाऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात.

‘पांडुरंग’ या नावामागील शास्त्र !

‘विठ्ठल हे विष्णूचे रूप असून ‘वि’ म्हणजे जाणणे, तर ‘ठोबा’ म्हणजे ज्ञानमय मूर्ती. विठ्ठलाची मूर्ती काळी असली, तरी सूक्ष्म दर्शनेंद्रियांवाटे ती पांढरीच दिसते, म्हणून ‘पांडुरंग’ या नावाने तिला ओळखले जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वारकर्‍यांची अनुपम विठ्ठलभक्ती !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वारकऱ्यांचे जाणून घेतलेले मनोगत इथे प्रस्तुत करीत आहोत.

साधकांमधील तीव्र अहंभावाचे रूपांतर भक्तीभावात करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होण्यापूर्वी मी नियती, प्रारब्ध, देव इत्यादींवर श्रद्धा ठेवून जीवन जगत होतो; मात्र माझ्यातील अहंभावामुळे माझ्या जीवनात सतत उलथापालथ होऊन मी दुःखाच्या खाईत लोटला जायचो…

गुरुपौर्णिमा आणि श्री गुरु यांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व !

‘आषाढ पौर्णिमेचा दिवस हा ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘व्यास जयंती’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ‘गुरुपूजन’ केले जाते. महर्षि वेदव्यास हे पराशरऋषि आणि सत्यवती यांचे सुपुत्र होते.

सतत भावावस्थेत रहाण्याचे महत्त्व !

नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो.

भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो !

ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणार्‍या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

देवाजवळ काय मागावे ?  

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, मला तुझा कधीही विसर न पडावा, असा वर दे. मी आनंदाने तुझे गुण गाईन. माझी सर्वकाही मिळकत तूच आहेस. हे भगवंता, तुझे रूप सदैव माझ्या नयनी असावे.’

भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे !

स्वतःला भक्त म्हणवणारे काही लोक दिवसातून एक घंटा देवाचे नाव घेतात आणि मग म्हणतात, ‘‘आता २३ घंटे कसेही वागले, तरी प्रत्यवाय (हरकत) नाही.’’ पतीव्रता असे म्हणू शकेल का की, मी केवळ एक घंटा पातिव्रत्य पाळणार आणि मग २३ घंटे कसेही वागणार ?

आदर्श भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपी !

‘भक्ती ही परम प्रेमस्वरूप असावी’, असे भक्तीचे स्वरूप सांगून नारद सांगतात – भक्ती ‘यथा व्रजगोपिकानाम् ।’ (नारदभक्तिसूत्र, अध्याय २, सूत्र २१), म्हणजे ‘गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी.’ व्रजगोपिकांची कृष्णावरील भक्ती ‘अव्यभिचारिणी’ होती…