देवाजवळ काय मागावे ?  

‘देवाचा कधीही विसर पडू नये’, असा वर मागणारे जगद्गुरु संत तुकाराम !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, मला तुझा कधीही विसर न पडावा, असा वर दे. मी आनंदाने तुझे गुण गाईन. माझी सर्वकाही मिळकत तूच आहेस. हे भगवंता, तुझे रूप सदैव माझ्या नयनी असावे.’

मुलगी कान-नाक टोचून घेण्याचे दुःख भोगण्यास का सिद्ध होते ? तिला अलंकार घालण्याचे सुख मिळावे म्हणून. मातेला प्रसूतीवेदना भोगल्यानंतरच मातृत्वाचा आनंद भोगता येतो. तसेच गर्भवासाचे दुःख उपभोगल्यावर मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि मगच सत्संग घडू शकतो. यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘(तुझा विसर पडणार नसेल, तर) आम्हाला खुशाल पुन्हा गर्भवास (जन्म) दे.’

(सनातनचा ग्रंथ : सुगम भक्तीयोग)