सातारा येथे वडिलांसह मुलाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लावून १ कोटींची फसवणूक !

ऑनलाईन फसवणूक करणार्‍यांना वेळीच कठोर शिक्षा होत नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार होतात !

बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित !

माजी आमदार के.पी. पाटील अध्यक्ष असलेल्या वेदगंगा सहकारी कारखान्याच्या डिस्टलरी (मद्य निर्मिती उद्योग) प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केला आहे. दोन दिवसांपूर्वी या कारखान्याची अचानक पडताळणी करण्यात आली होती.

पुणे येथे संतप्त धर्मांधाकडून बहिणीच्या हिंदु प्रियकराच्या वडिलांची अमानुष हत्या !

लहाडे रस्त्यात उभे असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने लहाडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये लहाडे यांच्या डोक्यातून आणि हातातून प्रचंड रक्तस्त्राव झाला अन् त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

कुख्यात गुंड विजय पलांडे याची सरकारी अधिवक्ता पालटण्याची मागणी !

महाराष्ट्रातील कुख्यात गुंड तसेच विविध हत्याकांडांतील आरोपी विजय पलांडे याने स्वतःच्या खटल्यात ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यास विरोध केला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कत्तलीपासून गोवंशियांची मुक्तता !; एस्.आर्.पी.एफ्. भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी युवकांचा गोंधळ !…

जालना येथे ‘एस्.आर्.पी.एफ्.’ची (राज्य राखीव पोलीस दलाची) २४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये मैदानी चाचणीमधील १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात गैरप्रकार होत असल्याचे विद्यार्थ्यांना वाटले.

अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश !

‘पुणे येथील हिट अँड रन म्हणजे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून साेडण्यात यावे’, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २५ जून या दिवशी दिला आहे.

२७ जूनपासून पावसाळी अधिवेशनास प्रारंभ !

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून चालू होत आहे. २८ जून या दिवशी राज्याचा उर्वरित काळासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 

अमली पदार्थ मेजवानी झालेल्या ‘एल्-३ बार’चा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित !

पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी अवैध पब्जवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अमली पदार्थांशी निगडीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.

आळंदी देवस्थानचे प्रमुख योगी निरंजन यांची आंदोलनाची चेतावणी

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारी सोहळ्यावर इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्याचे संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातत्याने रसायनमिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात आहे.

सिन्नर (नाशिक) येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा !

नाशिकच्या महापालिका आयुक्तांकडून या पालखीचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले. या पालखीचा रिंगण सोहळा या वेळी पार पडला.