१२ कोटी ८२ लाख रुपये शासकीय महसूल बुडवल्याचा अहवाल !
कोल्हापूर – माजी आमदार के.पी. पाटील अध्यक्ष असलेल्या वेदगंगा सहकारी कारखान्याच्या डिस्टलरी (मद्य निर्मिती उद्योग) प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केला आहे. दोन दिवसांपूर्वी या कारखान्याची अचानक पडताळणी करण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या पडताळणीनंतर काढलेल्या निष्कर्षानुसार कारखान्याच्या मळीच्या साठ्यात मोठा फरक आढळला असून मुंबई मळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्रकल्पात अतिरिक्त मद्यसाठा आढळून आला असून वारंवार सूचना देऊनही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही. कारखान्याने १२ कोटी ८२ लाख रुपयांचा शासकीय महसूल बुडवल्याचा अहवाल विभागाने दिला आहे. या कारवाईमुळे कारखाना सभासद शेतकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे.