मुंबई – धावत्या रेल्वेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या नूर नावाच्या धर्मांधाला प्रवाशांनी चोप दिला. या प्रकरणी मुंबई सेंट्रल लोकमार्ग पोलीस ठाण्यात नूर याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रवाशांच्या मारहाणीत घायाळ झालेल्या नूर याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. उपचारानंतर पोलीस त्याला अटक करणार आहेत.
पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिचे वडील दादर रेल्वेस्थानकावर मुंबई उपनगरात जाणार्या रेल्वेमध्ये चढले. रेल्वे परळ येथे आली असता नूर अल्पवयीन मुलीच्या जवळ बसून तिला अयोग्य पद्धतीने हात लावत होता. मुलीच्या तक्रारीनंतर तिच्या वडिलांनी नूर याला विचारणा केली असता तो अरेरावी करायला लागला. या वेळी रेल्वेमधील प्रवशांनी नूर याला चोप दिला. हे वृत्त सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यावर त्याला प्रतिसाद देतांना अशा नराधमाला चोप दिल्याविषयी अनेकांनी प्रवाशांचे अभिनंदन केले आहे.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना धडा शिकवण्यासाठी युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण आत्मसात करावे ! |
१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण