चहाचे मळे राम सातपुतेंच्या नावावर करण्याचे काँग्रेसचे आव्हान

‘शिंदे यांचे आफ्रिकेत चहाचे मळे आहेत’, अशा आरोपाचे प्रकरण

डावीकडून राम सातपुते आणि सुशीलकुमार शिंदे

सोलापूर – माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदें यांच्या दक्षिण आफ्रिकेतील चहाच्या मळ्यांची कागदपत्रे दाखवा, जर त्यांनी कागदपत्रे दाखवली, तर चहाचे मळे राम सातपुते यांच्या नावावर करू, असे आव्हान सोलापूर काँग्रेसने भाजप उमेदवार राम सातपुते यांना दिले आहे. भाजप उमेदवार राम सातपुते हे सोलापुरात आल्यापासून सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका करत आहेत.

भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत, ‘शिंदे यांचे दक्षिण आफ्रिकेत चहाचे मळे आहेत’, असे म्हटले होते.