नेपाळ येथे पलायन करतांना पोलिसांची कारवाई !
नाशिक – शेअर्स मार्केटमधील ॲक्युमेन आणि गुडवील आस्थापनांचे प्रमाणपत्र दाखवून अन् ब्रोकर असल्याचे सांगून आस्थापनांत गुंतवणूक केल्यास प्रतिमहा ४ टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवण्यात आले. यात आरोपी युवराज पाटील (रा. बेळगाव, कर्नाटक) याने माजी सैनिकांना १ कोटी ३८ लाख रुपयांचा गंडा घातला. तो नेपाळ येथे पलायन करत असतांना पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने पणजी (गोवा) विमानतळावर त्याला पकडून अटक केली. त्याच्याकडून ७ भ्रमणभाषसंच आणि पारपत्र (पासपोर्ट) जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वर्ष २०२० मध्ये गुन्हा नोंद आहे.
संपादकीय भूमिकाअशा फसव्या लोकांकडून संबंधित रक्कम वसूल करून घ्यावी ! |