साधिकेने जाणलेले गुरुकृपेचे महत्त्व !

‘गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रारब्ध भोगण्याचे बळ मिळते’, याविषयी आमची पुन्हा निश्चिती झाली.’

अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर’ हे हिंदूंच्या एकजुटीचा परिणाम ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री

दीर्घ संघर्षानंतर आज आपण अयोध्येत प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर निर्माण करत आहोत, हा हिंदूंच्या एकजुटीचा परिणाम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी हिंदु महासंमेलनात केले.

‘महावितरण’ विभागाकडून एकाच दिवशी दीड कोटी रुपयांची वीजचोरी उघड !

‘महावितरण’कडून पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरी विरोधामध्ये एकाच दिवशी राबवलेल्या मोहिमेमध्ये १ सहस्र २७६ ठिकाणांहून १ कोटी ५९ लाख रुपयांच्या विनाअनुमती (अनधिकृत) वीजवापराचे प्रकार उघड झाले आहेत.

२०३ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी परळी वैद्यनाथ कारखाना विक्रीस !

२०३ कोटी रुपयांच्या थकित कर्जाच्या प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाने या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ई-लिलावाची प्रक्रिया २५ जानेवारी या दिवशी ठेवली आहे.

श्रीराममूर्तीच्‍या प्राणप्रतिष्‍ठेनिमित्त महाराष्‍ट्रात आनंदाच्‍या शिधाचे वाटप होणार !

अयोध्‍येत २२ जानेवारी या दिवशी होणारी श्रीराममूर्तीची  प्राणप्रतिष्‍ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांनिमित्त महाराष्‍ट्रातील शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधावाटप करण्‍यात येणार आहे.

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या रथाचे सांगली येथे आगमन !

केंद्रशासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचा रथ १० जानेवारीला सांगलीत आला आहे. रथाचे स्वागत सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

डोंबिवलीत बारमध्‍ये मद्य प्‍यायलेल्‍या तरुणाने चिडून दुसर्‍याला गोळी मारली !

असुरक्षित डोंबिवली ! अमेरिकेप्रमाणेच आता भारतातही कधीही कुणीही चिडून गोळीबार करू लागल्‍याची स्‍थिती निर्माण झाली आहे, असे यावरून म्‍हणावे का ?

पिंपरी (पुणे) शहरात कोयता गँगची दहशत चालूच !

भोसरीतील वर्दळीच्या राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली नुकतेच दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत ३ जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला मारहाण करत लुटले.

डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे १८ ते २० जानेवारीला पुणे येथे आयोजन ! – मुरलीधर मोहोळ, माजी महापौर

रामजन्मभूमीवर होणार्‍या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर डॉ. कुमार विश्वास यांच्या वाणीतून ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन १८ ते २० जानेवारी या कालावधीत एस्.पी. कॉलेजच्या मैदानावर सर्वांसाठी विनामूल्य करण्यात येणार आहे.

जोगेश्‍वरी येथील शाळेत मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्‍याविषयी प्रबोधन !

पालकांना निमंत्रित करून त्‍यांनी त्‍यांच्‍या मुलांना मराठी माध्‍यमात घालण्‍याचा निर्णय किती अचूक आणि योग्‍य आहे ?, हे सांगण्‍यात आले. या वेळी या शाळेतून उत्तीर्ण होऊन विदेशात स्‍थायिक झालेल्‍या किंवा मोठ्या पदावर असणार्‍या विद्यार्थ्‍यांविषयी या वेळी माहिती देण्‍यात आली.