मुंबई – अयोध्येत २२ जानेवारी या दिवशी होणारी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांनिमित्त महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधावाटप करण्यात येणार आहे. १० जानेवारी या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आनंदाच्या शिधामध्ये १ किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल १०० रुपयांमध्ये दिले जाणार आहे. राज्यातील दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे.