साधिकेने जाणलेले गुरुकृपेचे महत्त्व !

श्रीमती अश्विनी प्रभु

‘१२.३.२०२३ या दिवशी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये श्री. राज कर्वे यांचा ‘ज्योतिष्यशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात लक्षात घ्यावयाची सूत्रे !’  हा लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख वाचतांना मला आमच्या संदर्भात घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली.

‘मार्च २०२३ मध्ये आमच्या घरातील सर्वांची प्रकृती बिघडली होती. पू. राधा प्रभु यांना पुष्कळ खोकला झाला होता. त्यांना सतत खोकला येत असल्याने त्यांची कंबर दुखत होती. त्यामुळे त्यांना नामजपादी उपाय करायला जाता येत नव्हते. माझा मुलगा श्री. भरत याला श्वासाच्या संदर्भात तीव्र त्रास होत होता. माझी अनेक दिवसांपासून पाठ दुखत असल्याने मी झोपू शकत नव्हते. औषधोपचार घेऊनही आमचा त्रास न्यून होत नव्हता. अनुमाने एक ते दीड मास अशीच परिस्थिती होती.

तेव्हा आम्ही ठरवले, ‘वास्तूत काही दोष किंवा त्रास आहे का ? त्यावर काही उपाय करावा लागेल का ?’, असे आमच्या पुरोहितांना विचारायचे.’ (पुरोहितांनी ज्योतिष्याचा अभ्यास केला असून पौरोहित्यात शिरोमणी पदवी प्राप्त केलेली आहे.) त्यांना आम्हा चौघांची (माझा मुलगा श्री. भरत, सून सौ. भवानी, नातू सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम आणि माझी) पत्रिका दाखवली. तेव्हा सर्वांच्या पत्रिका पाहून त्यांनी सांगितले, ‘‘तुमची वास्तू पुष्कळ चांगली आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुमच्या सर्वांच्या पत्रिकेत गुरु ग्रह बलवान आहे. तुम्ही काही विधी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या समाधानासाठी पंचमीच्या दिवशी तुमच्या मूळ स्थानी जाऊन नागदेवतेला अभिषेक करा आणि शिवाच्या देवस्थानात जाऊन या.’’

त्यांचे बोलणे ऐकून ‘गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रारब्ध भोगण्याचे बळ मिळते’, याविषयी आमची पुन्हा निश्चिती झाली.’

– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के,वय ५८ वर्षे), मंगळुरू (१२.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक