‘महावितरण’कडून पडताळणी मोहीम !
पुणे – ‘महावितरण’कडून पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरी विरोधामध्ये एकाच दिवशी राबवलेल्या मोहिमेमध्ये १ सहस्र २७६ ठिकाणांहून १ कोटी ५९ लाख रुपयांच्या विनाअनुमती (अनधिकृत) वीजवापराचे प्रकार उघड झाले आहेत. वीजतारेवर आकडे टाकून आणि वीजमीटरमध्ये पालट करून ८६९ ठिकाणी ९६ लाख ५८ सहस्र रुपयांची थेट वीजचोरी केल्याचे आढळून आले. पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीजजोडण्यांची पडताळणी करण्यात आली. वीजचोरी आणि विनाअनुमती वीजवापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड आणि नवीन वीजदेयक देण्यात आले आहे. या देयकांचा त्वरित भरणा न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाकोट्यवधी रुपयांची वीजचोरी होत असतांना कुणालाच कळत नाही, हे गंभीर आणि लज्जास्पद ! |