हैदराबाद ते अयोध्या सायकलने प्रवास !

या तरुणांनी ‘श्री रामललाच्या मंदिर निर्मितीमध्ये खारीचा वाटा असावा’, या उद्देशाने चांदीची १ किलो वजनाची वीट दान देण्यासाठी आपल्या समवेत घेतली आहे.

इन्स्टाग्रामवर मैत्री करून २५ वर्षीय युवतीला फसवणार्‍या आरोपीविरोधात गुन्हा नोंद !

इन्स्टाग्रामवर मैत्री करून विवाहाचे आमीष दाखवून २५ वर्षीय युवतीसमवेत लैंगिक संबंध ठेवून तिला फसवणार्‍या आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १०८ फूट उंचीच्या श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना होणार !; कोयता गँग नाही ! – उपमुख्यमंत्री फडणवीस…

१०८ फूट उंचीच्या श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना होणार ! अक्कलकोट – श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास, हे माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी ‘श्री स्वामी समर्थ अनुभूती प्रकल्प’ सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले. राम तलाव या परिसरात ४२ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट … Read more

शाहूपुरी परिसरात कलश पूजन यात्रा भावपूर्ण वातावरणात पार पडली !

शाहूपुरी भागातील शाहूपुरी तालीम आणि कुंभार वसाहत या भागांमध्ये कलश पूजन शोभायात्रा काढण्यात आली. ४ थी गल्ली येथील दत्तभक्त मंदिर येथून यात्रेचा प्रारंभ झाला आणि विविध मार्गांवर जाऊन दत्तमंदिर येथे यात्रेचा समारोप झाला.

दत्तजयंतीनिमित्त माहूर येथे दत्तशिखरावर जाणार्‍या भाविकांची गैरसोय !

याला प्रशासन आणि पोलीस यांच्यातील नियोजनशून्य कारभारच कारणीभूत आहे !

नववर्षाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार !

या आधी दिवसभरात मार्गिका १ वर ८१ फेर्‍या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून ११३ फेर्‍या होतील. मार्गिका २ वरील फेर्‍यांची संख्या ८० वरून १११ पर्यंत वाढणार.

नवी मुंबई महानगरपालिका अग्नीशमन केंद्रात जुगार खेळणारे ५ कर्मचारी निलंबित !

ते जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. याची नोंद घेत प्रशासन विभागाने संबंधित कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.

श्रीमद्भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाच्या चिंतनाने भगवंताची निश्चित प्राप्ती ! – ह.भ.प. निळकंठ महाराज देशमुख

भगवंताला ओळखता आले पाहिजे. सत्ययुगात ज्ञान, त्रेतायुगात ध्यान, द्वापारयुगात उपासना आणि कलीयुगात नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानाचा संबंध बुद्धीशी, ध्यानाने मन स्थिर होते.

पुणे येथील ससून रुग्णालयात वैद्यकीय देयकांच्या संमतीसाठी लाच घेणार्‍या ‘लिफ्टमन’ला अटक !

एका नोकरदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुसलमानांनी आक्रमण केलेल्या गुहा (अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ देवस्थानामध्ये कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेल्या सहस्रो एकर भूमी कधी कह्यात घेणार ?