कोल्हापूर – शाहूपुरी भागातील शाहूपुरी तालीम आणि कुंभार वसाहत या भागांमध्ये कलश पूजन शोभायात्रा काढण्यात आली. ४ थी गल्ली येथील दत्तभक्त मंदिर येथून यात्रेचा प्रारंभ झाला आणि विविध मार्गांवर जाऊन दत्तमंदिर येथे यात्रेचा समारोप झाला. या भागातील सामाजिक कार्यकर्ते श्री. शैलेश पाटील आणि मित्र परिवार यांनी याचे नियोजन केले होते. यात्रेत एका विशेष रथात श्रीराम, लक्ष्मण, माता सीता यांची वेशभुषा करण्यात आली होती आणि रथात कलश ठेवण्यात आला होता. या कलशाचे नागरिकांनी ठिकाठिकाणी ओवाळून, तसेच फुले वाहून स्वागत केले.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक श्री. आप्पा दड्डीकर, शहर संघचालक श्री. प्रमोदजी ढोले, भाजपचे श्री. महेश जाधव, श्री. विजय जाधव, श्री. योगेश कडोलीकर, ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’चे श्री. शशिकांत कुलकर्णी यांसह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ, श्रीरामभक्त उपस्थित होते.
सनातन संस्थेच्या वतीने शाहूपुरी येथे कलशाचे पूजन !
कलश घेतलेली फेरी जेव्हा शाहूपुरी ४ थ्या गल्लीतील दत्तभक्त मंदिर येथे आली, तेव्हा सनातन संस्थेच्या वतीने कलशाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.