नवी मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – मद्य पिऊन जुगार खेळल्याच्या आरोपाप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे अग्नीशमन केंद्रातील ५ अग्नीशमन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.
ते जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. याची नोंद घेत प्रशासन विभागाने संबंधित कर्मचार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. तसेच त्यांना स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले होते, तसेच त्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये कर्मचार्यांनी असा प्रकार केला होता कि नाही, हे निष्पन्न होणार आहे. निलंबित केलेल्या कर्मचार्यांमध्ये सचिन शिंदे, अक्षय सिसोदे, विनोद देठे, विनोद गायकवाड, हेमंत भरसट यांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकाअशा कर्तव्यचुकारांना निलंबित करण्यापेक्षा बडतर्फच करायला हवे ! |