हैदराबाद – तेलंगाणाच्या हैदराबादमधील भाग्यनगर डबीलपुरा येथून ७ रामभक्त युवक सायकलने १ सहस्र १५० किलोमीटरचा प्रवास करत अयोध्येसाठी १७ डिसेंबरला निघाले आहेत. या तरुणांनी ‘श्री रामललाच्या मंदिर निर्मितीमध्ये खारीचा वाटा असावा’, या उद्देशाने चांदीची १ किलो वजनाची वीट दान देण्यासाठी आपल्या समवेत घेतली आहे. २ जानेवारी २०२४ पर्यंत अयोध्या येथे पोचणार आहेत.