पैठण येथे ४५० वर्षांनंतर श्री संत एकनाथ महाराजांच्या हस्ताक्षरातील एकनाथी भागवत गीतेची हत्तीवरून मिरवणूक !

पैठण येथे एकनाथी भागवत गीता ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढतांना भाविक

पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज समाधी चतु:शतकोत्तर सुवर्णमहोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत जयंती महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळा याची २७ नोव्हेंबर या दिवशी येथे सांगता झाली. या वेळी संत एकनाथ महाराजांच्या हस्ताक्षरातील ‘एकनाथी भागवत गीते’ची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यापूर्वी वर्ष १५७३ (शके १४९५) मध्ये ज्या वेळी नाथ महाराजांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला, त्यानंतर श्रीक्षेत्र काशी (वाराणसी) येथे ७ दिवस या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर प्रतिष्ठाननगरीत ४५० वर्षांनंतर ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत

२ सहस्र भाविकांचा सहभाग होता. नाथवंशज योगरिाज महाराज, सर्व नाथवंशजांसह पारायण सोहळ्यातील २ सहस्र भाविक डोक्यावर श्री एकनाथी भागवताची प्रत घेऊन सहभागी झाले होते. ‘भानुदास-एकनाथ’च्या जयघोषाने सारा आसमंत दणाणून गेला.

भागवत गीतेचा ग्रंथ डोक्यावर घेऊन मिरवणूक काढतांना भाविक