श्री गुरु तारिती सार्‍यातूनी ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘श्री गुरूंनी ज्याला कृपाछत्राखाली घेतले, त्याच्या सर्व संकटांचे हरण श्रीगुरुच करतात. आईने बाळासाठी धाव घ्यावी, तसे गुरु भक्तासाठी धावून येतात. मग ‘भक्ताने चिंता का करावी ?’, हे मनाला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सौ. स्‍वाती शिंदे

श्री गुरु तारिती सार्‍यातूनी ।
धावूनी येती संकटसमयी ।
जाणिले हे मी मनोमनी ।
मग चिंता करू कशाची’ ।। १ ।।

– सौ. स्वाती संदीप शिंदे (२८.१२.२०२२)

काळानेही आनंद तो अनुभवला ।

‘श्री गुरूंना चरणस्पर्श करतांना मनाला काय जाणवते ?’, याचे स्मरण केल्यावर मनात आलेले विचार येथे दिले आहेत.

क्षण हा अवचित आला ।
तव चरण स्पर्श करता ।
जणू काळ हा थांबला ।
काळानेही आनंद अनुभवला’ ।। १ ।।

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२३)