पुणे – शहरात वाहतूक पोलिसांनी ८५ सहस्र वाहनचालकांकडून दंड वसूल केला आहे. यामध्ये ‘ट्रिपल सीट’ (दोनचाकी गाडीवर तिघेजण बसणे) गाडी चालवणे, ‘सिग्नल’ तोडणे, ‘नो-पार्किंग’च्या ठिकाणी गाडी उभी करणे, तसेच विरुद्ध दिशेने गाडी चालवणे आदी कारणांचा समावेश आहे. यामध्ये ५५ सहस्र वाहनचालकांकडून ‘सिग्नल तोडणे’ यासाठी ३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ‘ट्रिपल सीट’ गाडी चालवतांना १७ सहस्र वाहनचालकांवर कारवाई करत १ कोटी ७० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या १० मासांतील ही कारवाई आहे.
संपादकीय भूमिका :वाहतुकीचे नियम अजूनही पाळले न जाणे, म्हणजे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |