ए.टी.एम्.मधील रक्‍कम चोरणार्‍यांना अटक !

सोलापूर – नगर जिल्‍ह्यातील ए.टी.एम्. यंत्रामधील रक्‍कम चोरणार्‍या ४ आरोपींना माढा येथे रोख रकमेसह अटक झाली. अन्‍य एका आरोपीचा शोध चालू आहे. संबंधित आरोपी माढा येथे लपल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी पळून जातांना पोलिसांनी पकडले. यात साहाय्‍य केल्‍याविषयी सर्वश्री प्रशांत पाटील, बाळू लटके, सतीश लटके, शंकर जाधव, तात्‍या धर्मे, राहुल धर्मे यांचे पोलिसांनी कौतुक केले. श्री. शंकर जाधव हे सनातन संस्‍थेचे साधक आहेत.