मडगावमधील सभेत हिंदुत्वनिष्ठांवर टीका करणारे अधिवक्ता भेंब्रे यांच्या विधानांवर राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई यांचा प्रतिप्रश्न !
पणजी – उदय भेंब्रे यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. ते साहित्यिक, संपादक, तसेच विद्वान विचारवंत आहेत; पण ‘हिंदु’ हा शब्द आला की, त्यांची बुद्धी भ्रष्ट होते, मग ते काहीही बरळतात. ‘कुणी लाठी चालवायला शिकवतात, तर कुणी बाँब फोडायला’, असे म्हणत ते हिंदुत्वनिष्ठांवर टीका करतात. उदय भेंब्रे हे स्वत: हिंदु आहेत. त्याचा अभिमान नसलेले उदय भेंब्रे मडगावमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, तेव्हा झोपले होते का ?, असा सडेतोड प्रश्न ‘राष्ट्रीय बजरंग दल, गोवा’चे प्रमुख श्री. नितीन फळदेसाई यांनी उपस्थित केला आहे. अधिवक्ता भेंब्रे यांच्या लोहिया मैदानात झालेल्या सभेतील वक्तव्यांवर श्री. फळदेसाई यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
३१ ऑक्टोबरला मडगावमधील लोहिया मैदानात ‘गोंयकार एक पावल एकचाराचें’ ही एकात्मता सभा झाली. या सभेत अधिवक्ता उदय भेंब्रे म्हणाले होते की, भाजपच्या रा.स्व. संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, अभाविप या अशा सलग्न संघटना असून त्या देशात हिंदु राष्ट्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र घटनेप्रमाणे देशात पहिला अधिकार हा मुसलमानांना असून नंतर हिंदु, ख्रिस्ती आणि अन्य यांना आहे. (गोमंतकियांची दिशाभूल करणारे भेंब्रे ! ‘देशात पहिला अधिकार हा मुसलमानांना आहे’, असे राजयघटनेत कुठे लिहिले आहे ? मुसलमानांसाठी वेगळे राष्ट्र म्हणून भारत तोडून पाकिस्तान निर्माण झाला. मग उर्वरीत भारत हिंदूंचा नाही का ? – संपादक) घटनेनुसार ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करता येणार नाही; म्हणून इतर मार्ग अवलंबले जात आहेत. (काँग्रेसने आणीबाणी लादून वर्ष १९७५ मध्ये घटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’, हे शब्द घुसडले, तर आताही घटनेत पालट करून हिंदु राष्ट्र का घोषित करता येणार नाही ? – संपादक)
श्री. फळदेसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उदय भेंब्रे यांच्यासारखे नीच विचार असलेली अनेक मंडळी गोव्यात असल्याने, तसेच त्यांचीच फूस असल्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस अतिरेकी विचारसरणीचे लोक करू शकतात. रस्त्यावर नमाज पठण करणार्यांना, ‘लव्ह जिहाद’ करणार्यांना आणि ‘१५ मिनिटे सैन्य बाजूला करा, मग आम्ही दाखवतो’, असे सांगणार्या ओवैसींना राज्यघटना धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगावे.