छत्रपती संभाजीनगर येथे निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याविषयी १० कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !

छत्रपती संभाजीनगर – भारत निवडणूक आयोगाच्या कामात हलगर्जीपणा करणे, वारंवार संपर्क करूनही शासकिय कर्मचारी कामावर उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या आदेशाने अव्वल कारकून रमेश तांबे यांनी ४ ऑक्टोबर या दिवशी शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर येथील १० कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हा नोंद झालेल्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांचाही समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यात सध्या संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम चालू आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक विभागाच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश तहसील कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार गारखेडा परिसरातील गजानन बहुउद्देशीय शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, विद्यापीठ, तसेच नारेगाव महापालिका शाळेतील कर्मचार्‍यांना नियुक्त केले होते; मात्र वारंवार पत्रव्यवहार आणि संपर्क करूनही हे कर्मचारी कामावर उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे निवडणूक कामात अडथळा निर्माण झाला. अखेर तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या आदेशावरून वरील कारवाई करण्यात आली.

या कर्मचार्‍यांवर झाला गुन्हा नोंद…

मुख्याध्यापक मिसाळ एस्.जी., सहशिक्षिका श्वेता रमाकांत साबळे, गजानन बहुउद्देशीय शाळा गारखेडा, गारखेडा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कन्या विद्यालय गारखेडा येथील मुख्याद्यापिका श्रीमती देशमुख, शिक्षक शेख एस्.ए., जाधव एस्.डी.,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे, कर्मचारी आ.टी. साबळे, महापालिका शाळा नारेगाव येथील मुख्याद्यापिका श्रीमती ताज, सहशिक्षक कि.दौ. बावस्कर, कैलास टेकाळे.