‘गुरुतत्त्व एकच असते’, याची आलेली अनुभूती आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सुचवलेली प्रार्थनारूपी कविता

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. व्‍यष्‍टी आढावा आणि भावसत्‍संगात गुरुस्‍मरण वाढवण्‍यास सांगणे

‘माझा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा सौ. तनुजा गाडगीळ (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के) यांच्‍याकडे असतो. १९.५.२०२१ या दिवशी ताईने आम्‍हाला गुरुस्‍मरण वाढवून त्‍यामध्‍ये सातत्‍य ठेवण्‍यास सांगितले. २०.५.२०२१ या दिवशी भावसत्‍संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंनीही गुरुस्‍मरण वाढवण्‍यास सांगितले. त्‍यानुसार त्‍या आठवड्यात गुरुस्‍मरण वाढले आणि सातत्‍य ठेवता आले.

२. गुरुस्‍मरण वाढवण्‍यासाठी गुरुमाऊलीने प्रार्थनारूपी काव्‍य सुचवणे

७.५.२०२१ या दिवशी पुढचा भावसत्‍संग होता. त्‍या दिवशी सकाळी वैयक्‍तिक आवरतांना विचार चालू होते की, ‘मी गुरुस्‍मरण कसे वाढवू ? काय करू ?’ (देवाला आळवत होते.) तेव्‍हा गुरुमाऊलीनेच पुढील प्रार्थनारूपी काव्‍य सुचवले. ते त्‍यांच्‍या चरणी अर्पण करते.

सौ. प्रज्ञा जोशी

लागो गुरुमाऊलींच्‍या (टीप) कृपाशीर्वादाचा ध्‍यास ।

देवा, माझा भक्‍तीभाव वाढू दे ।
तुझ्‍या चरणांशी मला जागा मिळू दे ॥ १ ॥

ओथंबून वाहू देत भावाचे झरे ।
तेव्‍हाच आठवण होते तुझी म्‍हणावे खरे ॥ २ ॥

करता येऊ दे कृती, भावाला जोडून ।
कर्तेपणा जाईल तेव्‍हा अहंकाराला सोडून ॥ ३ ॥

वहाता येऊ देत तुझ्‍या चरणी सुगंधित फुले ।
सांभाळूनी घेशील ना, आम्‍ही तुझीच अज्ञानी अपराधी मुले ॥ ४ ॥

स्‍वेच्‍छा, परेच्‍छा, ईश्‍वरेच्‍छा अशी होईल वाटचाल ।
तेव्‍हाच गुरुमाऊली तुम्‍ही हात धराल ॥ ५ ॥

देवा, तुझे प्रेम मिळेल भरभरून ।
जेव्‍हा येऊ आम्‍ही स्‍वभावदोष अहं सारून ॥ ६ ॥

न राहो आम्‍हा ती मायेची आस ।
लागो गुरुमाऊलींच्‍या (टीप) कृपाशीर्वादाचा ध्‍यास ॥ ७ ॥

अवीट गोडी आठवणींची कळू दे मनाला ।
देवा, तुझेच स्‍मरण होऊ दे क्षणाक्षणाला ॥ ८ ॥

देवा, तुझेच अस्‍तित्‍व राहो हृदयमंदिरात ।
तेव्‍हाच ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापना होईल प्रत्‍यक्षात ॥ ९ ॥

टीप – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३. भावसत्‍संगातही प्रार्थनारूपी काव्‍यातील सूत्रे सांगितल्‍याने भावजागृती होणे

२७.५.२०२१ या दिवशीच्‍या ‘भावसत्‍संगातही श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंनी मार्गदर्शनात कवितेतील सूत्रे सांगितली’, असे लक्षात आले आणि माझी भावजागृती झाली. श्री गुरुमाऊलींच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली की, माझे व्‍यष्‍टी साधनेचे अत्‍यल्‍प प्रयत्न चालू असतांनाही त्‍यांनी गुरुतत्त्व एकच असल्‍याची अनुभूती मला दिली. कोटीशः कृतज्ञता.’

– तुमची चरणसेविका,

सौ. प्रज्ञा पुष्‍कराज जोशी, देवद आश्रम, पनवेल. (६.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक