
पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक करणार्या तेलंगाणा येथील अरविंद आरोगोंडा (वय ४७ वर्षे) याला येरवडा पोलिसांनी कह्यात घेतले. आरोपीने आतापर्यंत ४० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांच्या विरोधात भाग्यनगर आणि मुंबई येथे फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, ‘परिमंडळ ४’चे पोलीस उपायुक्त, साहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांनी ही कारवाई केली.
आरोपी आणि त्याच्या साथीदाराने ‘लर्निंग सोल्युशन्स प्रा.लि.’ नावाचे आस्थापन भाग्यनगरमध्ये चालू केले होते. मुंबई, पुणे येथे याच्या शाखाही चालू केल्या होत्या. विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे विज्ञापन त्यांनी सामाजिक माध्यमात प्रसारित केले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी ५ लाख रुपये, तर खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी ३ लाख रुपये, असे शुल्क ते आकारत होते. ‘वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्यास पैसे परत करू’, असे आमीष त्यांनी दाखवले; मात्र पैसे न देता फसवणूक केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !