भारतात ९२ कोटी रुपये पाठवल्याचा ‘ईडी’चा आरोप
वैध ‘एफ्.सी.आर्.ए.’ नोंदणीविना निधी प्राप्त केल्याचा दावा

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेंगळुरू शहरातील अमेरिकेतील एक ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि ७ व्यक्ती यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या संस्थेवर ९२ कोटी ५५ लाख रुपयांहून अधिक निधी भारतात अवैधयित्या पाठवल्याचा आरोप आहे. या निधीतील काही भाग छत्तीसगड आणि आसाम येथील माओवादी नक्षलवाद्यांनी प्रभावित भागांपर्यंत पोचल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
१. कोथानूर पोलीस ठाण्यात ‘ईडी’च्या तक्रारीवरून प्रविष्ट करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, ‘टिमोथी इनिशिएटिव्ह’ (टीटीआय) या संस्थेने अमेरिकी बँकेच्या डेबिट कार्ड्सचा वापर करून भारतात विदेशी निधी पाठवला. ‘टिमोथी इनिशिएटिव्ह’ या संस्थेचे मुख्यालय रॅले, नॉर्थ कॅरोलिना (अमेरिका) येथे आहे. त्यानंतर कर्नाटक, छत्तीसगड आणि आसाम येथील ‘ए.टी.एम्.’मधून ही रोख रक्कम काढण्यात आली. हे कृत्य ‘फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट’ (एफ्.ई.एम्.ए.) आणि ‘फॉरेन कॉन्ट्रीब्युशन (रेग्युलेशन) ॲक्ट’ (एफ्.सी.आर्.ए.) चे उल्लंघन करणारे आहे. नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत एकूण ९२ कोटी ५५ लाख रुपयांचा (९.९ दशलक्ष डॉलर्स) व्यवहार केल्याचा आरोप आहे.
२. गेल्या काही वर्षांत भारतभर १ सहस्राहून अधिक विदेशी डेबिट कार्ड्सचे वाटप केल्याचा आरोप आहे. ‘ईडी’चे साहाय्यक संचालक सुनील कुमार सिंघमार यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीत जोनाथन एस. राजन (‘टिमोथी इनिशिएटिव्ह’च्या भारत कामकाजाचे प्रमुख, बेंगळुरू ), मिका मार्क (बेंगळुरू), अजित वर्गीस मथाई (कोथानूर), वर्गीस चाको (धमतरी, छत्तीसगड), बबलू कुर्मी (आसाम) आणि सुप्रीम जॉय (म्हैसुरू) यांचीही नावे आहेत. ही कार्डस कथितरित्या ‘संतोष कुमार’ या टोपणनावाने जारी करण्यात आली होती.
३. ‘ईडी’ने उघड केले की, अन्वेषणाच्या वेळी दिसून आले की, माओवादी-प्रभावित धमतरी जिल्ह्यातील एका सहकारी बँकेच्या ‘विजया पालेजा’ शाखेतील ‘ए.टी.एम्.’मध्ये विदेशी डेबिट कार्ड्सचा वापर केला गेला होता. वर्गीस चाको हा रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेवर देखरेख करत होता.
४. या विदेशी निधीचा उद्देश माओवादी-प्रभावित भागांमधील अवैध कारवायांना पाठिंबा देणे हा होता.
५. जोनाथन राजन यांच्याकडे संपूर्ण भारतातील ‘टीटीआय’च्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याचे दायित्व होते. त्याने निधी वळवण्यासाठी अजित वर्गीस मथाई यांच्याशी समन्वय साधल्याचा आरोप आहे.
६. अजित मथाई याच्या कार्यालयाची झडती घेतली असता ३७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !