बर्न (स्वित्झर्लंड) – देशाची लोकसंख्या वर्ष २०५० पर्यंत १ कोटीपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या आणि स्थलांतरावर अधिक कठोर निर्बंध आणण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी सार्वमताद्वारे जोरदार विरोध केला. उजव्या विचारसरणीच्या ‘स्विस पीपल्स पार्टी’पुरस्कृत या प्रस्तावाच्या विरोधात ५५ टक्के मतदारांनी मतदान केल्याने तो फेटाळण्यात आला.
स्थलांतरामुळे वाढणारी लोकसंख्या, गृहनिर्माणावरील ताण, सार्वजनिक सेवा आणि पर्यावरणावरील दबाव यांचा संदर्भ देत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव संमत झाला असता, तर १ कोटीची लोकसंख्येची मर्यादा ओलांडल्यास युरोपीयन युनियनसमवेतच्या मुक्त हालचालीच्या करारासह काही आंतरराष्ट्रीय करारांचा फेरविचार करावा लागला असता.
उद्योग संघटना, अर्थतज्ञ, काही सरकारी प्रतिनिधी आदींनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. त्यांनी औषधनिर्माण, वित्त, तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा क्षेत्रांमध्ये परदेशी कामगारांची आवश्यकता अधोरेखित करत त्यांच्यावर बंदी घातल्यास अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो, अशी चेतावणी दिली.

अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani