रस्ते आणि इमारती यांची नावेही पालटली
नवी देहली – भारतीय सैन्याने परंपरांमधील वसाहतकालीन खुणा पुसून टाकण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत सैन्य गणवेशाची (‘आर्मी युनिफॉर्म-२०२६’ची) नवी नियमावली लागू केली. १७४ पानांच्या या नियमावलीत अनेक जुन्या ब्रिटीशकालीन प्रथांमध्ये पालट करण्यात आला असून हे पालट भारताची सार्वभौम ओळख आणि राष्ट्रीय भावना यांच्याशी सुसंगत असल्याचे सैन्याने स्पष्ट केले आहे.
नवीन नियमांनुसार संचलनाचे निरीक्षण करणार्या अधिकार्यांना (‘रिव्ह्यूइंग ऑफिसर’ना) तलवार बाळगणे आता ऐच्छिक असेल. सैनिकी मेजवान्याच्या वेळी वापरल्या औपचारिक पोशाखासमवेत (‘मेस ड्रेस’समवेत) वापरल्या जाणर्या ‘पाऊच बेल्ट’ची अनिवार्यता रहित करण्यात आली असून ‘रॉयल’सारख्या शब्दांचाही वापर बंद करण्यात आला आहे. औपचारिक नागरी पोशाखात प्रथमच स्वदेशी बंद गळ्याच्या सदर्याचा (‘बंदी जॅकेट’चा) समावेश करण्यात आला आहे. हे जॅकेट पूर्ण बाह्यांचा शर्ट, तसेच पँट यांवर परिधान करता येणार आहे.
सैनिकांच्या वैयक्तिक रहाणीमानाच्या संदर्भातही मार्गदर्शक तत्त्वे !
नियमावलीत सैनिकांच्या वैयक्तिक रहाणीमानाच्या संदर्भातही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. अनुमतीविना दाढी वाढवणे, असामान्य केशरचना करणे, दृश्यमान इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे, ‘टॅटू’ (शरीरावर गोंदवलेले चित्र किंवा लिखाण) काढणे आदींना मनाई करण्यात आली आहे. तसेच लग्नसमारंभ, खासगी मेजवान्या (पार्ट्या), राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि निदर्शर्ने यांमध्ये पूर्वअनुमतीविना गणवेश परिधान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वर्ष २०२३ मध्ये बंद केल्या गेल्या अनेक जुन्या प्रथा !
सैन्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये अनेक जुन्या प्रथा बंद केल्या होत्या. यांमध्ये समारंभांच्या वेळी घोड्यांच्या गाड्यांचा वापर, निवृत्तीच्या वेळी केला जाणारा ‘पुल-आउट’ सोहळा आणि रात्रीच्या भोजनाच्या वेळी वाजवले जाणारे ‘पाईप बँड’ यांचा समावेश होता.
रस्ते आणि इमारती यांना स्वदेशी नावे !सैन्याने यावर्षी विविध तळांवरील २४६ रस्ते, इमारती आणि सुविधा यांची नावे पालटून वसाहतकालीन वारसा पुसून टाकण्याचा उपक्रमही राबवला आहे. त्याजागी शौर्य पुरस्कार विजेते, युद्धवीर आणि प्रतिष्ठित सैनिकी नेते यांच्या नावांना प्राधान्य देण्यात आले आहे. अंबाला, मथुरा, जयपूर, बरेली, महू, डेहराडून आणि कोलकाता येथील विविध सैन्य तळांना असलेली ब्रिटीश नावे पालटण्यात आली आहेत. |

FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा
Baba Milan Das : साधू राममिलन दास यांची हत्या करणारा इस्रायल पोलीस चकमकीत ठार
बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा ! : Sangeet Singh Som
Ayush Malik Conversion : पसार आरोपी तौफिकला अटक
केरळम् : मदरसा शिक्षकाशी लग्न ठरल्याने अप्रसन्न झालेल्या १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या
US-Based Christian Missionary : ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि ७ व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद