
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील कोट्यवधी रुपयांच्या ‘ग्रीन सिटी प्रोजेक्ट’ अर्थात् सौर ऊर्जा प्रकल्पातील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी आरामबाग नगरपालिकेचे माजी अध्यक्ष स्वप्न नंदी यांना केरळमधून अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ग्रीन सिटी प्रोजेक्ट’ घोटाळ्याचे अन्वेषण गतीने चालू झाल्यानंतर स्वप्न नंदी फरार झाले होते. अटक टाळण्यासाठी त्यांनी स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पोलिसांच्या विशेष पथकाने केरळमध्ये त्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात यापूर्वीच नगरपालिकेचे अभियंता, विद्युत् पर्यवेक्षक आणि एक कंत्राटदार यांना अटक करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक
फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि धमकावणे, या आरोपांवरून तृणमूल काँग्रेसचे नेते माणिक दास यांनाही अटक करण्यात आली आहे. ते सिंगूर शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. दास यांच्या विरोधात वर्ष २०१४ मध्ये गुन्हा नोंदवला गेल्यानंतर चंदननगर न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. ते माजी मंत्री बेचाराम मन्ना यांचे निकटवर्तीय मानले जातात.
महिलांशी अश्लील वर्तन : तृणमूल काँग्रेसचा नेता रेझाउल खान अटकेत
बांकुरा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचा ‘इंदपूर ब्लॉक’चा माजी अध्यक्ष रेझाउल खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. खान याच्याविरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून त्याला मारहाण करणे, महिलांशी अश्लील वर्तन करणे, तसेच बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देणे, असे आरोप आहेत. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदाराच्या ३ सदनिकांवर पोलिसांची कारवाई
कल्याणी येथील तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार मुकुटमणी अधिकारी यांच्या मालकीच्या ३ सदनिका पोलिसांनी बंद (सील) केल्या. या सदनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी साहाय्याचे साहित्य साठवून ठेवल्याची तक्रार भाजपने केली होती. पोलिसांनी ई-मेलद्वारे नोटीस पाठवून सदनिका उघडण्याचे निर्देश दिले होते; मात्र दिलेल्या समयमर्यादेत प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी गृहनिर्माण प्रकल्पांचे प्रवर्तक गौरंग सरकार यांनाही नोटीस पाठवण्यात आली असून पुढील अन्वेषण चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी