आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

२५० कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्याचे प्रकरण

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम् पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम् पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना ९ सप्टेंबरच्या पहाटे कौशल्य विकास घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांना मध्यरात्री उशिरा अटक वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर चंद्राबाबू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह अटकेला विरोध केला; मात्र काही घंट्यांनी त्यांना अटक करण्यात आली.

वर्ष २०२१ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात कौशल्य विकास घोटाळ्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. २५० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामध्ये चंद्रबाबू हे प्रथम क्रमांकाचे आरोपी आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे अजामीनपात्र आहेत.

संपादकीय भूमिका

घोटाळेबाजांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !