Ayush Malik Conversion : पसार आरोपी तौफिकला अटक

शामली (उत्तरप्रदेश) येथील हिंदु तरुणाचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याचे प्रकरण

अटक करण्यात आलेला आरोपी तौफिक

शामली (उत्तरप्रदेश) – येथील आयुष मलिक नावाच्या हिंदु तरुणाचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तौफिक उर्फ भोला या पसार आरोपीला नुकतीच अटक केली. आयुष मलिक याचे धर्मांतर आणि निकाह (इस्लामी पद्धतीने विवाह) लावून देण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप तौफिकवर आहे. पोलिसांनी आरोपीच्या कह्यातून एक ‘निकाहनामा’ही (विवाह करारही) जप्त केला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणात शामलीतील एक प्रसिद्ध मुसलमान डॉक्टर आणि काही मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) यांची भूमिकाही अन्वेषण यंत्रणांकडून पडताळण्यात येत आहे.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी तौफिक हा शामली येथील रहिवासी आहे. त्याच्यावर यापूर्वीच अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत आणि तो या प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा होता.

२. याआधी मुख्य आरोपी व्यायाम प्रशिक्षक (‘जिम ट्रेनर’) चांदनी कुरेशी आणि तिचे वडील इस्लाम कुरेशी यांना ७ जून २०२६ या दिवशी अटक करून कारागृहात डांबण्यात आले होते.

३. शामलीतील मुसलमान डॉक्टरसोबत नमाजपठण करतांनाची आयुष मलिक याची छायाचित्रे प्रसारित झाली होती. त्यादृष्टीने पोलीस अन्वेषण करत आहेत

४. देहली आणि मुंबई येथील काही मौलवींच्या भूमिकेचेही सखोल अन्वेषण केले  जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

५. आयुष मलिक याचे वडील आणि औषध व्यापारी तसेच ‘केमिस्ट्स असोसिएशन’चे अध्यक्ष देवराज मलिक यांनी आरोप केला आहे की, त्यांचा मुलगा आयुष मलिक याने २०१८ मध्ये ‘कुरेशी प्लस’ या आधुनिक व्यायामशाळेत  जाण्यास चालू केले होते. त्यांचा दावा आहे की, तेथील प्रशिक्षक चांदनी कुरेशी, तिचे कुटुंब आणि काही मौलवी यांनी हळूहळू त्याचा बुद्धीभेद केला.

६. आयुष मलिकने बुद्धीभेद आणि धमकीविषयी वडिलांनी केलेले दावे फेटाळून लावले आहेत. ‘ मी प्रसिद्ध पाकिस्तानी इस्लामी अभ्यासक डॉ. इसरार अहमद यांचे व्हिडिओ पाहिले, ज्यामुळे माझ्यात इस्लामविषयी आवड निर्माण झाली’, असे आयुषने सांगितले.

७. शामलीचे पोलीस अधीक्षक एन्.पी. सिंह यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाचे  सर्व बाजूंनी अन्वेषण केले जात आहे. सध्या पोलीस या टोळीशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

भारतात खरे असुरक्षित कोण, मुसलमान कि हिंदु ?