मंदिराचेही होणार स्थलांतर
कोलकाता (बंगाल) – कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने ‘नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या धावपट्टीजवळ असलेली १३६ वर्षे जुनी ‘बांकरा मशीद’ (ही ‘गौरीपूर जामे मशीद’ म्हणूनही ओळखली जाते) स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विमानतळाच्या जवळील एक मंदिरही विमानतळाच्या सुधारणा योजनेचा भाग म्हणून स्थलांतरित केले जाणार आहे. विमानतळ अधिकार्यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे.
१. विमानतळ संचालक विक्रम सिंह यांनी सांगितले की, हे स्थलांतर एका व्यापक पुनर्विकास प्रकल्पाचा भाग आहे. धार्मिक भावनांचा आदर राखून विमानतळ परिसराबाहेर एक मोठी आणि आधुनिक मशीद बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता ४ कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
२. विमानतळाजवळील एक मंदिरही विमानतळाच्या सुधारणा योजनेचा भाग म्हणून स्थलांतरित केले जाणार आहे. विकासाच्या विषयी कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे उत्तर दमदमचे भाजप आमदार सौरव सिकदार यांनी सांगितले.
३. या महिन्याच्या प्रारंभी नबान्न येथे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांची प्रशासकीय अधिकारी आणि आमदार यांच्यासोबत झालेल्या पहिल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती.
४. कोलकाता विमानतळाचे अधिक कार्यक्षम आणि जागतिक दर्जाच्या सुविधेत रूपांतर करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

बांगलादेशातील शिवगंज उपजिल्ह्याचे नाव पालटून ‘महास्थान’ होणार !
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा
Baba Milan Das : साधू राममिलन दास यांची हत्या करणारा इस्रायल पोलीस चकमकीत ठार
बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा ! : Sangeet Singh Som
Ayush Malik Conversion : पसार आरोपी तौफिकला अटक
केरळम् : मदरसा शिक्षकाशी लग्न ठरल्याने अप्रसन्न झालेल्या १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या