देवतांचा अवमान सहन केला जाणार नाही ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – येथे सुहान खान याच्या ‘इंस्टाग्राम’ खात्यावरून देवतांविषयी अश्लील टिपणी केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता सुहान खान याच्या ‘इंस्टाग्राम’ खात्यावरून त्याच्या नकळत त्याचा मित्र कैस शेख याने ती टिपणी केल्याचे आढळले. त्याला संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नेले असता पोलिसांसमोर कैस शेख याने गुन्हा मान्य केला. त्याने २ समाजांमध्ये तेढ निर्माण केली असल्याने त्याच्यावर ५ सप्टेंबर या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही विघ्नसंतोषी लोक २ समाजांत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करणे, सामाजिक माध्यमांवर वादग्रस्त, अश्लील टिपणी करणे, हे धार्मिक सण-उत्सवांत जाणीवपूर्वक करतांना दिसून येते. यापुढे असे कृत्य खपवून घेणार नसल्याचे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी सांगितले आहे.
संपादकीय भूमिका :स्वतःच्या धर्माविषयी कट्टर असणारे धर्मांध, हिंदु धर्माचा वारंवार, सहजपणे अवमान करतात, हे संतापजनक आहे. देवतांचा अवमान रोखण्यासाठीचा कठोर कायदा व्हावा; म्हणून लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार का ? |
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !